advertisement

अभिनेत्री असलेल्या खासदारांची साडीला खास पसंती; सांसदेत काही ड्रेसकोड असतो का?

Last Updated:

सर्व महिला खासदार तुम्हाला सांसदेत नेहमी साडीच दिसतील. त्या साडीला केवळ परिधान नव्हे, तर आपली ओळख समजतात. पण प्रश्न असा उभा राहतो की भारतीय संसदेत खासदारांसाठी कोणतं अधिकृत ड्रेस कोड आहे का?

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : भारतीय संसद म्हणजे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचं सर्वोच्च मंदिर मानलं जातं जिथे विविध क्षेत्रातील लोक प्रतिनिधी बनून पोहोचतात. या ठिकाणी काही महिला खासदार आपल्या कार्यक्षमतेसह आपल्या वेशभूषेमुळेही चर्चेत राहतात. बॉलीवूडच्या झगमगाटातून संसदेत पोहोचलेल्या अभिनेत्री खासदारांमध्ये हेमा मालिनी, जया बच्चन, किरण खेर आणि कंगना राणावत यांचा समावेश आहे. या सर्व महिला खासदार तुम्हाला सांसदेत नेहमी साडीच दिसतील. त्या साडीला केवळ परिधान नव्हे, तर आपली ओळख समजतात. पण प्रश्न असा उभा राहतो की भारतीय संसदेत खासदारांसाठी कोणतं अधिकृत ड्रेस कोड आहे का?
भारतीय संसदेत अधिकृत आणि लिखित असा कोणताही ड्रेस कोड नाही. मात्र, सभागृहाची गरिमा टिकवण्यासाठी सादगीपूर्ण आणि पारंपरिक पोशाख घालण्याची एक अलिखित परंपरा नक्कीच आहे.
बहुतेक महिला खासदार साडी किंवा सलवार-कुर्ता यासारखे भारतीय पोशाख परिधान करतात. पुरुष खासदार कुर्ता-पायजामा, धोती किंवा सूटमध्ये दिसतात. उदाहरण म्हणून, 2019 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांनी वेस्टर्न पोशाख परिधान केल्यामुळे त्यांच्यावर समाजमाध्यमांकडून टीका झाली होती.
advertisement
सांसद म्हणजे आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे लोक. भारतातील अनेक भागांमध्ये अजूनही पारंपरिक पोशाख लोकांच्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. त्यामुळे साडी, धोती, कुर्ता यांसारखे पोशाख घालून खासदार आपल्या लोकांशी भावनिक नातं टिकवून ठेवतात. उदाहरणार्थ, ममता बॅनर्जी यांची साधी सूती साडी ही बंगालमध्ये त्यांची साधेपणाची ओळख बनली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक खासदार धोती-कुर्तामध्येच दिसतात, जे स्थानिक लोकांची जीवनशैली आणि संस्कृती दर्शवतात.
advertisement
काही महिला खासदार खास करून हातमागावर तयार झालेल्या साड्यांची पसंती करतात. डिंपल यादव अनेकदा सौम्य रंगांच्या हँडलूम साड्यांमध्ये पाहायला मिळतात. तर कंगना राणावत ज्या हल्ली भाजपकडून खासदार झाल्या आहेत, त्या आपल्या स्टायलिश हँडलूम साड्यांमुळे चर्चेत असतात. दुसरीकडे, अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांना पारंपरिक कांजीवरम सिल्क साड्यांची विशेष आवड आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
अभिनेत्री असलेल्या खासदारांची साडीला खास पसंती; सांसदेत काही ड्रेसकोड असतो का?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement