Do You Know : हिमालयवरुन उडताना पायलटला का दिसतात 3 सुर्य? 99 टक्के लोकांना माहित नाही यामागचं सत्य
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काय आहे यामागचे रहस्य आणि हे दोन नकली सूर्य कसे तयार होतात, हे जाणून घेऊया.
मुंबई : विमानातून प्रवास करताना खिडकीतून बाहेर बघणे, हे सर्वात रोमांचक अनुभव असतात. पण कल्पना करा, तुम्ही विमानात आहात आणि तुम्हाला एकाच वेळी आकाशात तीन सूर्य दिसले तर? ही कोणती जादू आहे की दृष्टीभ्रम? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. पण असं खरोखर घडतं. ज्याबद्दल अनेक पायलटने आणि प्रवाशांनी सांगितलं आहे. दिल्लीहून काठमांडूपर्यंत किंवा इतर उंच मार्गांवरून प्रवास करणारे वैमानिक अनेकदा आकाशात हे अद्भुत दृश्य पाहिल्याचे सांगतात. ही कोणतीही कॉकपीटमधील काचेमुळे होणारी गडबड नसून, ही एक नैसर्गिक वातावरणीय घटना आहे, ज्याला शास्त्रीय भाषेत 'सनडॉग' किंवा 'पॅरहेलियन' असे म्हणतात.
काय आहे यामागचे रहस्य आणि हे दोन नकली सूर्य कसे तयार होतात, हे जाणून घेऊया.
सनडॉग म्हणजे काय?
सनडॉग ही वातावरणातील प्रकाशाच्या अपवर्तनामुळे (Refraction) घडणारी घटना आहे. ही घटना तेव्हा घडते, जेव्हा सूर्याचा प्रकाश हवेत तरंगणाऱ्या बर्फाच्या कणांवर पडतो आणि परावर्तित होतो.
6,000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर सिरोस्ट्रेटस नावाचे ढग तयार झालेले असतात. हे ढग पातळ आणि षटकोनी आकाराच्या बर्फाच्या स्फटिकांचे (Crystals) बनलेले असतात, जे जमिनीला समांतर जुळलेले असतात.
advertisement
हे बर्फाचे कण एका लहान प्रिझम प्रमाणे काम करतात. ते सूर्याच्या प्रकाशाला कमीतकमी 22 अंशांपर्यंत वाकवतात. यामुळे, खऱ्या सूर्याच्या दोन्ही बाजूला तितक्याच उंचीवर, तेजस्वी प्रकाशाचे दोन गोल तयार होतात, जे हुबेहूब सूर्यासारखे दिसतात. यामुळे आकाशात तीन सूर्य दिसल्याचा भास होतो.
फक्त उंच ठिकाणीच का?
ही घटना नेहमी 9 to 12.8 km च्या उंचीवर घडते. या उंचीवर हवा सतत वरच्या दिशेने जाते. जेव्हा ओलसर हवा पर्वतांवर धडकते आणि वर ढकलली जाते, तेव्हा ती थंड होते आणि त्यातील पाण्याची वाफ बर्फाच्या स्फटिकांमध्ये (Ice Crystals) गोठते. याच स्फटिकांमुळे सिरोस्ट्रेटस ढग तयार होतात, जे सनडॉगसाठी आवश्यक असतात.
advertisement
नासाच्या म्हणण्यानुसार, हिमालयाचा प्रदेश सनडॉग पाहण्यासाठी पृथ्वीवरील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. येथील -40 ते -60 अंश सेल्सिअस तापमान आणि भारतीय मान्सूनमुळे येणारी विपुल आर्द्रता वर्षभर आदर्श बर्फ स्फटिक तयार करते.
विमान प्रवासाला धोका आहे का?
उड्डाण करताना सनडॉग या घटनेमुळे विमानाला कोणताही धोका नसतो. मात्र, अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या पुस्तकात वैमानिकांना या घटनेची माहिती दिली जाते. महत्त्वाच्या टप्प्यांदरम्यान वैमानिकांनी चुकून या नकली सूर्याला दुसरे विमान किंवा खरा सूर्य समजू नये, यासाठी त्यांना याची ओळख असणे आवश्यक असते.
advertisement
थोडक्यात, हिमालयाच्या आकाशातील हे दृश्य विज्ञान आणि निसर्गाचे एक अद्भुत मिश्रण आहे, जे केवळ नशीबवानांनाच विमानातून पाहता येते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 10:08 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Do You Know : हिमालयवरुन उडताना पायलटला का दिसतात 3 सुर्य? 99 टक्के लोकांना माहित नाही यामागचं सत्य


