Monsoon Snake Safety : पावसाळ्यात साप घरात का शिरतात? ही आहे त्यामागची कारणं, तुम्ही तर 'या' चुका करत नाही ना?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सापांचा सुळसुळाट वाढतो. अनेकदा साप घरात शिरले असल्याच्याही घटना पाहायला मिळाल्या आहेत. पण असं का होतं? निसर्गात फिरणारा साप घरात का शिरतो? याचा विचार तुम्ही केलाय का?
मुंबई : पावसाळा आला की निसर्ग जणू काही नवीन जन्म घेतो. झाडांना नवीन पालवी फुटते. सगळीकडे हिरवळ असते. उन्हाळ्यात तापणारी जमीन अचानक शांत होते आणि ओलावा देऊ लागते. ज्यामुळे मन अगदी प्रसन्न वाटतं. पण या काळात निसर्गातले जीव जंतू देखील बाहेर पडू लागतात. यासोबतच पावसाळ्यात सापांचा सुळसुळाट वाढतो. अनेकदा साप घरात शिरले असल्याच्याही घटना पाहायला मिळाल्या आहेत. पण असं का होतं? निसर्गात फिरणारा साप घरात का शिरतो? याचा विचार तुम्ही केलाय का?
पावसात साप घरात का येतात?
पावसाळ्यात सापांच्या हालचाली अचानक वाढतात. यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे निवार्याच्या शोधात असलेले हे सरपटणारे प्राणी. ओलसर जागा, अन्नाचा सुगंध, अंधारे कोपरे अशा गोष्टी त्यांना घराच्या दिशेने आकर्षित करतात. विशेषतः शेतात किंवा गवताळ परिसरात असलेल्या घरांमध्ये ही समस्या अधिक जाणवते.
कोणत्या चुका सापांना देतात घरात येण्याचं आमंत्रण? चला जाणून घेऊ.
advertisement
1. खुलं ठेवलेलं धान्य
आपण अनेकदा डाळ, तांदूळ, गहू यासारखं धान्य उघडं ठेवतो किंवा नीट seal न करता ठेवतो. यामुळे घरात उंदीर आणि कीटक आकर्षित होतात आणि जिथे उंदीर, तिथे सापही कारण उंदीर हा सापाचा आवडता आहार आहे.
अशावेळी धान्य पूर्णपणे झाकून ठेवा, पावसाळ्यात अधिक काळजी घ्या.
2. उघडं डस्टबिन
स्वयंपाकघरात उघडं डस्टबिन ठेवणं सुद्धा धोकादायक ठरतं. उरलेलं अन्न, ओला कचरा यामुळे उंदीर येतात आणि त्यामागोमाग सापही.
advertisement
अशावेळी डस्टबिन झाकण लावून ठेवा आणि दररोज रिकामं करा.
3. लीकेज असलेली पाइपलाइन
जिथे पाणी गळतं, ओलसरपणा असतो तिथे साप लपायला जागा शोधतो. त्यांना पाणी प्यायला आणि थंड जागा दोन्ही हवं असतं.
अशावेळी सिंकखाली, पाइपजवळ गळती असेल तर तातडीनं दुरुस्ती करा.
4. मासे, मटण किंवा अंडी यांचा उग्र वास
या अन्नपदार्थांच्या वासामुळे बेडूक, उंदीर यासारखे छोटे प्राणी आकर्षित होतात आणि साप त्यांचा पाठलाग करत घरात शिरतात.
advertisement
अशावेळी या पदार्थांचा योग्य ठिकाणी ठेवा आणि वास घराबाहेर जाऊ देऊ नका.
5. अंधारे, घाणेरडे कोपरे
सापांना अंधार आणि शांत जागा आवडते. जर घराच्या कोपऱ्यांत जास्त दिवस स्वच्छता नसेल, तर तिथे साप येऊ शकतात.
अशावेळी प्रत्येक कोपऱ्यात नियमितपणे झाडू करा आणि ते कोपरे पुसुन साफ करा.
घरात साप येऊ नयेत म्हणून उपाय
कांदा आणि लसूण: यांचा तीव्र वास सापांना त्रासदायक वाटतो, त्यामुळे त्यांना खिडकीजवळ ठेवा, म्हणजे साप घरात प्रवास करणार नाहीत. शक्यतो साप याच मार्गांनी घरात प्रवेश करतात.
advertisement
लिंबाची पाने आणि फिटकरी (तुरटी): ही नैसर्गिक साधने सुद्धा सापांना घरात येण्यासाठी रोखतात.
सर्पगंधा किंवा तंबाखूचे झाड: हे झाड सापांना दूर ठेवण्यात उपयोगी पडते.
पावसाळा आनंदाचा असतो, पण काही चुकीच्या सवयीमुळे तो धोकादायक ठरू शकतो. जर आपण वेळेवर योग्य काळजी घेतली, तर सापांसारख्या धोकादायक जीवांपासून आपलं घर आणि कुटुंब सुरक्षित ठेवू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 22, 2025 5:14 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Monsoon Snake Safety : पावसाळ्यात साप घरात का शिरतात? ही आहे त्यामागची कारणं, तुम्ही तर 'या' चुका करत नाही ना?