advertisement

Shocking : सॅलेडमध्ये महिलेला मिळालं माणसाचं बोट, तिनं चघळलं आणि...

Last Updated:

खरंतर या महिलेनं सॅलड ऑर्डर केला ज्यामध्ये मानवी बोट होते. तिने तो बोट चघळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ज्यानंतर या महिलेला चक्क घाम फुटला.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 30 नोव्हेंबर : रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर लोकांना वेजच्या जागी नॉनवेज किंवा चुकीची ऑर्डर मिळाल्याचे अनेकांनी अनुभवले असेल, तर अनेकांनी याबद्दल वाचलं किंवा ऐकलं असेल. पण एका महिलेसोबत मात्र रेस्टॉरंटमध्ये विचित्र प्रकार घडला. ज्याबद्दल ऐकून तुमच्या नक्कीच पोटात गोळा येईल.
तुम्ही काही ऑर्डर केलं आणि त्यामध्ये तुम्हाला एखाद्या माणसाचं बोट सापडलं तर? नक्कीच यानंतर तुम्हाला धडकी भरेल. पण हे खऱ्या आयुष्यात घडलं आहे.
खरंतर या महिलेनं सॅलड ऑर्डर केला ज्यामध्ये मानवी बोट होते. तिने तो बोट चघळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ज्यानंतर या महिलेला चक्क घाम फुटला.
हे प्रकरण अमेरिकेतील कनेक्टिकट येथील आहे. ऍलिसन कोजी नावाच्या महिलेचे म्हणणे आहे की, तिने एप्रिलमध्ये सॅलड खाल्ले होते. त्यावेळी सॅलेडमध्ये तिला माणसाचं बोट आढळून आलं.
advertisement
तिने सांगितले की, ती 7 एप्रिल रोजी रेस्टॉरंटमध्ये आली होती. सॅलेट चघळताना तिला मानवी बोटाचा भाग खात असल्याचा भास झाला. सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, दाव्यात म्हटले आहे की रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने चुकून त्याचे बोट कापले. तो आदल्या दिवशी सॅलेटसाठी भाजी बनवत होता. तेव्हा त्याच्या बोटाचा भाग कापला गेला, जो सॅलेडमध्येच राहिला.
खरंतर बोट कापल्यानंतर ती व्यक्ती स्वत:वर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात गेली. पण त्याचं तुटलेलं बोट भाजीतच राहिलं. तेच सॅलड अनेक ग्राहकांना खायला दिलं गेलं. हे बोट पाहून महिलेला धक्का बसला आणि तिला पॅनिक अटॅक आला.
advertisement
या महिलेनं आता आरोप केला आहे की, सॅलड खाल्ल्यानंतर त्यांना मायग्रेन, स्मृतीभ्रंश, मळमळ, चक्कर येणे, मान आणि खांदेदुखी असे आजार निर्माण झाले. कोजीने रेस्टॉरंटला याची भरपाई करण्यास सांगितले. वेस्टचेस्टर काउंटी आरोग्य विभागाने या रेस्टॉरंटला आधीच $ 900 दंड ठोठावला आहे.
याप्रकरणी रेस्टॉरंटकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. सॅलड चेन आपल्या स्वच्छतेसाठी चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. खरं तर, यापूर्वी 2014 मध्ये एका व्यक्तीला त्याच्या रोलमध्ये मृत उंदीर सापडला होता.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Shocking : सॅलेडमध्ये महिलेला मिळालं माणसाचं बोट, तिनं चघळलं आणि...
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement