दूधाला भाव मिळाला नाही, गड्यानं स्वत:चीच डेअरी टाकली, आज 1500 शेतकऱ्यांसोबत करतोय काम, लाखोंची कमाई
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
धीरज सिंह यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दूध समितीमध्ये दूधाला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांनी स्वत: डेअरी फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला.
नीरज कुमार, प्रतिनिधी
बेगूसराय : कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. अनेकांनी रोजगार गमावला. नोकरी आणि व्यवसायात दोघांमध्ये अनेकांना फटका बसला. मात्र, असे असताना त्याकाळात डेअरी फार्म व्यवसायाला वेग आला. आताचा विचार केला असता दूध उत्पादनाबद्दल भारत हा जगातील नंबर 1 देश आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेश ही राज्ये या बाबतीत आघाडीवर आहेत.
advertisement
दूध उत्पादनात बिहार हे राज्यही मागे नाही. देशात दूध उत्पादनात बिहार तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे स्थान मिळवण्यात बिहारच्या बेगुसराय जिल्ह्याची स्वतःची वेगळी ओळख आहे. बेगुसरायला बिहारचे डेन्मार्क म्हटले जाते. येथील डेअरी फार्म व्यवसायाने संपूर्ण राज्यात आपली छाप सोडली आहे. तुम्ही सुधा डेअरी, अमृत सारख्या ब्रँड्सची उत्पादने वापरली असतील. पण आज आपण धीरज डेअरीबाबत जाणून घेऊयात.
advertisement
दूधाला योग्य भाव न मिळाल्याने सुरू केला व्यवसाय -
बेगूसराय जिल्ह्यातील मंझौल येथील रहिवासी धीरज सिंह यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दूध समितीमध्ये दूधाला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांनी स्वत: डेअरी फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी उद्योग विभागाकडून 25 लाखांचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला. मागील 4 वर्षांपासून हा व्यवसाय सुरू आहे. सध्या त्यांच्याकडे सुमारे 150 शेतकऱ्यांचे 1500 लिटर दूध येत आहे. या दुधाचा वापर मजूर आणि दूध प्रक्रिया यंत्राच्या साहाय्याने करून दररोज दूध, पनीर, तूप, मलई असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात.
advertisement
घर पाडायची गरज नाही, वास्तू दोष दूर करण्यासाठी फक्त या 4 गोष्टी करा, महत्त्वाची माहिती..
यानंतर, दूधापासून बनवलेल्या या उत्पादनांना कूलर मशीन वापरून थंड करण्यासाठी साठवले जाते. हे मशीन ताजेपणा टिकवून ठेवण्यास आणि वस्तू लवकर खराब होऊ नये, यासाठी देखील मदत करते. 250 लिटर ते 10 हजार लिटर दूध थंड करण्याची क्षमता असलेली यंत्रे बसवण्यात आली आहेत. या कारखान्यात 10 कामगार शिफ्टनुसार काम करतात. दररोज त्यांना 700 रुपये मिळतात, असे या कामगारांनी सांगितले.
advertisement
दिवसाला 5 हजार रुपयांची कमाई -
धीरज सिंह यांनी आपल्या व्यवसायाबाबत सांगितले की, दररोज 1500 लीटर दूधापासून विविध उत्पादने तयार करण्यासाठी त्यांना 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो. अशा स्थितीत जेव्हा हे उत्पादन बाजारात विकले जाते तेव्हा त्याची किंमत 80 ते 85 हजार रुपये आहे. तसेच दुग्धजन्य पदार्थातून त्यांना दररोज पाच हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही बेगुसराय किंवा बिहारच्या जवळपासच्या जिल्ह्यांतील किंवा जिथे प्राण्यांची संख्या जास्त असेल, तर डेअरी फार्म तुमच्यासाठी मोठ्या कमाईचा स्रोत ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
Location :
Begusarai,Bihar
First Published :
January 09, 2024 3:04 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
दूधाला भाव मिळाला नाही, गड्यानं स्वत:चीच डेअरी टाकली, आज 1500 शेतकऱ्यांसोबत करतोय काम, लाखोंची कमाई