कृषी हवामान : शेतीचे कामे थांबवा! या जिल्ह्यांना बसणार पावसाचा तडाखा, पुढील 24 तासांसाठी IMD चा अलर्ट

Last Updated:

Maharashtra Weather Update : संपूर्ण देशभरात मान्सून आता खऱ्या अर्थानं सक्रिय झालेला असून, जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर आणखी वाढला आहे.

maharashtra weather update
maharashtra weather update
मुंबई : संपूर्ण देशभरात मान्सून आता खऱ्या अर्थानं सक्रिय झालेला असून, जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मध्य भारत, उत्तर भारत, पर्वतीय राज्ये आणि ईशान्य भारतात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दक्षिण भारतातही पावसाचं दृश्य वेगळं नाही. या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्याची सुरुवातही देशभर पावसाळी वातावरणात होणार आहे. महाराष्ट्रात मात्र काही भागांत पावसाचा लपंडाव सुरू असून, काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात श्रावणसरींचा सुरुवात
महाराष्ट्रात श्रावण महिन्याच्या प्रारंभीच ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. मुंबई शहर, उपनगर, कोकण पट्टा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडत असून, ढगाळ वातावरणात मधूनच सूर्यप्रकाश डोकावतो आहे. या भागांत सध्या स्थिर वातावरण असून, नागरिकांनी छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
विदर्भात यलो अलर्ट
हवामान विभागानं विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येत्या २४ तासांत या भागांमध्ये तीव्र पावसाचा अनुभव येऊ शकतो. मध्य प्रदेशपासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं राज्यात पावसाचे प्रमाण असमान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
कोकणात पाऊस मर्यादित
कोकणातील अंतर्गत आणि किनारपट्टी भागांमध्ये ढगांची दाटी दिसून येत असून, वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे इथे पावसाचं प्रमाण तुलनेत कमी राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यामुळे या भागांतील शेतकऱ्यांनी पेरणी व मशागतीसंदर्भात पुढील दिवसांचे अंदाज पाहून नियोजन करावं.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा
सध्याच्या हवामान परिस्थितीचा विचार करता, शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामात विशेष दक्षता घेणं आवश्यक आहे. ढगाळ हवामान आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे शेतजमिनी ओलसर राहत आहेत, त्यामुळे ट्रॅक्टर किंवा अवजारे वापरताना मातीचे नुकसान होणार नाही. विशेषत: खरीप पिकाची विशेष काळजी घ्यावी. शेतात जास्त पाणी साचवन देऊ नये.  झाडाखाली थांबू नये, शेतातील विद्युत पंप आणि वायरिंग सुरक्षित ठेवावं. पेरणीपूर्व मशागत करताना जमिनीत ओलवा योग्य आहे की नाही, याची खात्री करावी. निंबोळी अर्क, जैविक कीटकनाशके यांचा वापर योग्य वेळी करण्याची तयारी ठेवावी, कारण हवामान बदलामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : शेतीचे कामे थांबवा! या जिल्ह्यांना बसणार पावसाचा तडाखा, पुढील 24 तासांसाठी IMD चा अलर्ट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement