7/12 उतारा नाही तरीसुद्धा शेतजमीन खरेदी करण्याची इच्छा आहे का? मग हे काम कराच!
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Property Rules : महाराष्ट्रामध्ये शेतजमीन खरेदीसंदर्भात एक विशेष नियम लागू आहे. फक्त शेतकरी असलेल्या व्यक्तीलाच शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी आहे. म्हणजेच ज्याच्या नावावर सातबारा उतारा आहे. तोच अधिकृत शेतकरी मानला जातो.
मुंबई : महाराष्ट्रामध्ये शेतजमीन खरेदीसंदर्भात एक विशेष नियम लागू आहे. फक्त शेतकरी असलेल्या व्यक्तीलाच शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी आहे. म्हणजेच ज्याच्या नावावर सातबारा उतारा आहे. तोच अधिकृत शेतकरी मानला जातो.
मात्र, या अटीमुळे अनेक अशा व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागतो, ज्यांना शेतीची आवड असूनही त्यांच्याकडे पूर्वीपासून शेती नाही. त्यामुळे ‘सातबारा नसतानाही शेतजमीन खरेदी करता येईल का?’ असा प्रश्न निर्माण होतो.याचे उत्तर "होय" आहे.पण यासाठी काही कायदेशीर पर्याय आणि प्रक्रिया पार पाडावी लागते.
1) वडिलोपार्जित शेतजमिनीचे विक्रीपत्र, एक महत्त्वाचा पुरावा
तुमच्या कुटुंबातील पूर्वजांनी जर शेतजमीन विकली असेल, तर त्या व्यवहाराचे विक्रीपत्र (Sale Deed) आणि जुना सातबारा क्रमांक पुरावा म्हणून वापरता येतो. हे दस्तऐवज सादर करून तुम्ही दाखवू शकता की तुमचे कुटुंब पूर्वी शेतकरी होते. यावरून वंशपरंपरेने शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र मिळवता येते.
advertisement
2) शेतकरी प्रमाणपत्र मिळवून अधिकृत पात्रता सिद्ध करा
एकदा विक्रीपत्राच्या आधारे आणि महसूल अभिलेखातून तुमची वडिलोपार्जित मालकी सिद्ध झाली, की संबंधित तालुका कार्यालय किंवा महसूल विभाग तुम्हाला शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र देतो.हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात कुठेही शेतजमीन खरेदी करू शकता.
3) नातेवाईकांच्या जमिनीवर नाव लावण्याचा पर्याय
जर तुमचे काका, मामा, आजोबा, किंवा इतर नातेवाईक शेतजमीनचे मालक असतील, तर त्या जमिनीच्या सातबारावर तुमचे नाव तात्पुरते लावता येते. यासाठी संबंधित नातेवाईकांची लेखी संमती आणि वारस हक्काने नोंदणी आवश्यक आहे.एकदा नाव लागल्यावर तुम्ही शेतकरी म्हणून पात्र ठरता आणि नंतर तुम्ही स्वतःची शेतजमीन खरेदी करू शकता. नंतर नातेवाईकांनी हक्क सोड प्रमाणपत्र दिल्यास, त्यांच्या जमिनीवरील तुमचा तात्पुरता हक्क काढता येतो.
advertisement
कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी काय करावे?
view commentsसर्व प्रक्रिया करताना महसूल विभाग, तलाठी कार्यालय, आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे. सर्व पुरावे दस्तऐवज रूपात सादर करावेत. व्यवहार नोंदणीकृत व कायदेशीर मार्गाने करावा.म्हणजे भविष्यात वाद निर्माण होणार नाहीत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 18, 2025 11:50 AM IST