advertisement

IPL 2026 : 'माझ्या मागे काय लागतो...', 25 कोटींच्या खेळाडूची रिपोर्टरसोबत बाचाबाची, आयपीएल आधी मोठा राडा!

Last Updated:

आयपीएल 2026 च्या 19व्या हंगामाला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे, पण त्याआधीच आयपीएलच्या सगळ्यात महागड्या खेळाडूने पत्रकारासोबतच पंगा घेतला आहे.

'माझ्या मागे काय लागतो...', 25 कोटींच्या खेळाडूची रिपोर्टरसोबत बाचाबाची, आयपीएल आधी मोठा राडा!
'माझ्या मागे काय लागतो...', 25 कोटींच्या खेळाडूची रिपोर्टरसोबत बाचाबाची, आयपीएल आधी मोठा राडा!
मुंबई : आयपीएल 2026 च्या 19व्या हंगामाला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे, पण त्याआधीच आयपीएलच्या सगळ्यात महागड्या खेळाडूने पत्रकारासोबतच पंगा घेतला आहे. फॉर्मबद्दल प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारासोबत या खेळाडूचा मोठा वाद झाला आहे. आयपीएल 2026 च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनला तब्बल 25.20 कोटी रुपये देऊन विकत घेतलं, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्रीनची कामगिरी निराशाजनक झाली आहे, त्यामुळे केकेआरची चिंता वाढली आहे.
शेफिल्ड शील्डमध्ये न्यू साऊथ वेल्सविरुद्ध खेळताना ग्रीनने 135 रनची खेळी केली आणि फॉर्ममध्ये परत आल्याचे संकेत दिले, पण मैदानाबाहेर पत्रकारासोबत झालेल्या बाचाबाचीमुळे ग्रीन वादात सापडला आहे. ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट्सनुसार ग्रीन त्याच्या बॅटिंग आणि फॉर्मबद्दल सुरू असलेल्या चर्चांमुळे दबावात आहे, तसंच तो चांगल्या मानसिक स्थितीमध्येही दिसत नाहीये. पत्रकाराने ग्रीनला त्याच्या खराब फॉर्मबद्दल विचारलं तेव्हा ग्रीन चांगलाच संतापला.
advertisement

माझ्या मागे का लागतो?

फॉर्मबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ग्रीनने पत्रकारावर पलटवार केला. 'तू माझ्या मागे का लागला आहेस?' असं ग्रीनने विचारलं. वाद वाढत असल्याचं लक्षात येताच वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक प्रशिक्षक ब्यू कासन यांनी मध्यस्थी केली. मुलाखत सुरू व्हायच्या आधीच ग्रीन दबावात वाटत होता, तसंच मॅचशिवाय कोणताही प्रश्न विचारू नका, असं रिपोर्टरला सांगण्यात आलं होतं, अशी माहितीही समोर येत आहे. पत्रकाराने जेव्हा ग्रीनला त्याच्या वैयक्तिक फॉर्मबद्दल विचारलं तेव्हा ग्रीनने उत्तर द्यायला नकार दिला आणि तो तिकडून रागामध्येच निघून गेला.
advertisement

वेळ फुकट घालवला

वेळ फुकट घालवला, असं म्हणून ग्रीन तिथून निघून गेला. कॅमरून ग्रीनचा फॉर्म हा केकेआरसाठी चिंतेचा विषय आहे. कारण ऍशेस 2025-26 मध्ये ग्रीनने 24.42 च्या सरासरीने फक्त 171 रन केले. तर टी-20 वर्ल्ड कपमध्ये ग्रीनने फक्त 8 च्या सरासरीने बॅटिंग केली. सिडनीमध्ये मात्र ग्रीनने शतक ठोकलं, हे ऑगस्ट महिन्यानंतर कोणत्याही फॉरमॅटमधलं त्याचं पहिलं शतक होतं. पण आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेआधी ग्रीनची वर्तणूक वादात सापडली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 'माझ्या मागे काय लागतो...', 25 कोटींच्या खेळाडूची रिपोर्टरसोबत बाचाबाची, आयपीएल आधी मोठा राडा!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement