वर्षभर जोपासलं,अर्ध्या तासात गमावलं! शेतकऱ्याची व्यथा ऐकून तुमचेही डोळे पाणावतील
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील धोंडगाव येथे मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अवघ्या अर्ध्या तासात झालेल्या वादळी पावसाने केळीच्या बागा उद्ध्वस्त केल्या आहेत.
वर्धा : विदर्भात मान्सूनच्या प्रवेशापूर्वीच मे महिन्यातच पावसाने धडक दिली असून, वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील धोंडगाव येथे मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अवघ्या अर्ध्या तासात झालेल्या वादळी पावसाने केळीच्या बागा उद्ध्वस्त केल्या आहेत. मेहबूब अली नजर अली सय्यद यांनी दोन एकर क्षेत्रावर केलेली केळी लागवड पूर्णतः जमिनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे वर्षभराची मेहनत वाया गेली आहे.
कांदा पिकांचे मोठे नुकसान
कांदा पिकाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्यासाठी चाळी नाहीत.त्यांनी ताडपत्री खाली कांदा झाकून ठेवला.परंतु पाऊस मोठ्या प्रमाणात आल्यामुळे कांद्यासह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अकोल्यात 'रेकॉर्डब्रेक' पाऊस, जनजीवन विस्कळीत
अकोल्यात मंगळवारी संध्याकाळी सलग तीन तास मुसळधार पावसाने हजेरी लावली, आणि हवामान विभागानुसार हा मे महिन्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस होता. पावसामुळे नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर ओसंडून वाहत आले, अनेक घरांमध्ये पाणी शिरले. वीज पुरवठा 15 तास खंडित राहिला, आणि इंटरनेट सेवाही ठप्प झाली. अकोल्यातील जिल्हा ग्रंथालय आणि स्त्री रुग्णालयात पाणी शिरल्याने प्रशासनाला धावपळ करावी लागली.
advertisement
महाबळेश्वरमध्ये लिंगमळा धबधबा प्रवाहित
साताऱ्याच्या महाबळेश्वर भागातही पावसाचा जोर सुरू असून, प्रसिद्ध लिंगमळा धबधबा प्रवाहित झाला आहे. ऐन मे महिन्यात फेसाळत वाहणाऱ्या धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटनाचीही चुरस वाढली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 29, 2025 11:08 AM IST