Indian Railway : ट्रेनमध्ये चिप्स खाल्ल्याने गाडीला लागतोय 'ब्रेक', कसं काय? रेल्वे मंत्रालयाच्या तपासात मोठा खुलासा

Last Updated:

Indian railway Food : ट्रेनमधून प्रवास करताना बरेच लोक गुटखा किंवा चिप्स खातात. यामुळेच अनेकदा तुमची ट्रेन उशिरा होत असल्याचं रेल्वे मंत्रालयाच्या तपासणीत उघड झालं आहे.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
नवी दिल्ली : कोणताही प्रवास म्हटलं की प्रवासात खाणंपिणं आलंच. भूक लागली किंवा टाइमपास म्हणून बरेच लोक प्रवासात चिप्स खातात. लहान मुलांना तर प्रवासात हमखास चिप्स दिले जातात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, ट्रेनमध्ये चिप्स खाल्ल्याने ट्रेन थांबू शकते, लेट होऊ शकते. असा अजब दावा केला आहे तो रेल्वे मंत्रालाने. रेल्वेने केलेल्या एका तपासणीतून हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.
ट्रेन मधेच थांबली आणि बराच वेळ थांबली तर प्रवास खूप कंटाळवाणा आणि थकवणारा होऊ शकतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ट्रेनला ब्रेक लागण्याचं कारण तुम्ही असू शकता. ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर गुटखा किंवा चिप्स खाल्ल्याने ट्रेन थांबू शकते. भारतीय रेल्वेने केलेल्या एका तपासणीतून हा खुलासा समोर आला आहे.
advertisement
देशभरात रेल्वे नेटवर्क 70000 किमी पेक्षा जास्त पसरलेलं आहे, जे अंदाजे 230000 गाड्या (प्रवासी आणि माल) सेवा देतात. केवळ प्रवासी गाड्यांची संख्या 13000 पेक्षा जास्त आहे. त्यापैकी अंदाजे 4000 प्रीमियम गाड्या (वंदे भारत, शताब्दी आणि राजधानी सारख्या) आणि मेल एक्सप्रेस गाड्या आहेत. प्रवाशांच्या बेजबाबदार वर्तनामुळे या गाड्या अनेकदा उशिराने धावतात.
advertisement
अलिकडेच भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेल्वे रुळांची तपासणी केली. रुळांवर आढळणाऱ्या सर्वात सामान्य कचरा म्हणजे गुटखा आणि चिप्सची पाकीटं. ज्यामुळे रेल्वे गाड्यांना ब्रेक लागत आहेत, त्या थांबत आहेत, लेट होत आहे.
advertisement
मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, प्रवासादरम्यान प्रवासी अनेकदा गुटख्याचं पाकिट फोडतात त्याचा वरचा काढलेला भाग खिडकीबाहेर फेकतात. गुटखा खाल्ल्यानंतर ते पाकिटही फेकून देतात. अनेकदा ही पाकिटं रूळांवर पडतात, हवेत उडतात आणि सिग्नलमध्ये अडकतात, ज्यामुळे सिग्नलमध्ये बिघाड होतात. सिग्नल बिघाडामुळे ट्रेन थांब्यावर थांबते, कारण रेल्वे मॅन्युअलमध्ये ट्रेनला त्या ठिकाणी थांबावं लागतं. परिणामी मागून येणाऱ्या गाड्या देखील थांबतात.
advertisement
जेव्हा सिग्नल खराब असल्याचं दिसून येतं तेव्हा लोको पायलट जवळच्या स्टेशन मास्टरला कळवतो. स्टेशन मास्टर स्वतः तिथं जातो किंवा जवळच्या गेटमनला पाठवतो. तो त्याची तपासणी करतो आणि सिग्नलमधून पाउच काढून टाकतो. त्यानंतर सिग्नल काम करतो आणि ट्रेन पुढे सरकते. त्याचप्रमाणे चिप्सचे पॅकेट कधीकधी हवेतून उडून सिग्नलमध्ये अडकू शकतात. गुटखा आणि चिप्समुळे ट्रेन थांबू शकतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Indian Railway : ट्रेनमध्ये चिप्स खाल्ल्याने गाडीला लागतोय 'ब्रेक', कसं काय? रेल्वे मंत्रालयाच्या तपासात मोठा खुलासा
Next Article
advertisement
BMC Election: कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे.

  • मेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच राजकीय हालचालींना वेग आला

  • काही महापालिकांमध्ये जुनी राजकीय समीकरणं विस्कटताना दिसत आहेत

View All
advertisement