तुमचा PM Kisan चा हप्ता बंद झालाय का? अर्जप्रक्रिया पुन्हा सुरू, नोंदणी करण्यासाठी कागदपत्रे, अटी कोणत्या?

Last Updated:
PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने नवीन निर्णय घेतला आहे.
1/6
pm kisan yojana
एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने नवीन निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे किंवा ज्यांची नावे लाभार्थी यादीतून हटवण्यात आली आहेत, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी दिली आहे. तसेच, नवीन शेतकऱ्यांनाही या योजनेत सहभागी होऊन दरवर्षी ६,००० रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ घेता येणार आहे.
advertisement
2/6
pm kisan
कोण अर्ज करू शकतात? - ज्यांची नावे योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळली गेली आहेत. नवीन पात्र शेतकरी, ज्यांनी अद्याप योजनेत नोंदणी केली नाही. या दोन्ही गटातील शेतकऱ्यांना आता पुन्हा अर्ज करण्याची संधी दिली आहे.
advertisement
3/6
पात्रतेचे निकष काय?
पात्रतेचे निकष काय? -  अर्जदार भारतीय नागरिक असावा. शेतीची जमीन अर्जदाराच्या नावावर (एकट्याची किंवा संयुक्त) असावी. अर्जदाराकडे वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहे.बँक खाते आधारशी जोडलेले असावे. संस्थात्मक जमीनमालक, सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे, डॉक्टर, अभियंते, वकील इ. व्यावसायिक या योजनेसाठी पात्र नाहीत.
advertisement
4/6
pm kisan
आवश्यक कागदपत्रे कोणती? - आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, जमिनीच्या मालकीचा पुरावा, आधारशी जोडलेला मोबाइल नंबर, नागरिकत्वाचा पुरावा
advertisement
5/6
pm kisan
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया - अधिकृत संकेतस्थळ https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या. होमपेजवरील “Farmers Corner” विभागात जाऊन “New Farmer Registration” वर क्लिक करा. शेतकरी ग्रामीण आहे की शहरी, हे निवडा. आपला १२ अंकी आधार क्रमांक, मोबाइल नंबर आणि राज्य निवडा, नंतर कॅप्चा कोड भरा. “Get OTP” वर क्लिक करा आणि आलेला OTP टाका. त्यानंतर उघडलेल्या फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती, बँक तपशील आणि जमिनीची माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा.
advertisement
6/6
pm kisan
नोंदणीनंतर माहिती आपोआप राज्य नोडल अधिकाऱ्यांकडे पडताळणीसाठी जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी पात्र ठरल्यास त्याचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट केले जाईल.
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement