प्रियकराच्या घरभाड्यासाठी पुण्यातील मुलीचं धक्कादायक कांड; काकाच्या घराचा दरवाजा ठेवला उघडा, पुढच्याच क्षणी...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
प्रियकर यशला घरभाड्यासाठी ३० हजार रुपयांची तातडीची गरज होती. ही गरज भागवण्यासाठी या अल्पवयीन मुलीने काकाच्या घरात दरोडा टाकण्याचा सल्ला दिला
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात प्रियकराचे घरभाडे भरण्यासाठी एका अल्पवयीन मुलीने चक्क आपल्याच काकाच्या बंगल्यात दरोड्याचा कट रचला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली असून यामध्ये उच्चशिक्षित तरुणांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
कल्याणीनगरमधील एका आलिशान बंगल्यात सोमवारी दुपारी दोन अज्ञात तरुण चाकू आणि दोरी घेऊन घुसले. घरातील महिलांनी प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्यामुळे हे दरोडेखोर तिथून पळून गेले. पोलिसांनी तांत्रिक तपास करून यश कुऱ्हाडे (२०), ऋषभ सिंह (२१) आणि राज भैरामडगीकर (२०) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता या गुन्ह्याचा मास्टरमाईंड घरातीलच व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
तक्रारदार महिलेच्या दिराच्या मुलीचे आरोपी यश कुऱ्हाडे याच्याशी प्रेमसंबंध होते. यशला घरभाड्यासाठी ३० हजार रुपयांची तातडीची गरज होती. ही गरज भागवण्यासाठी या अल्पवयीन मुलीने काकाच्या घरात दरोडा टाकण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे, प्रियकर आणि त्याचे मित्र घरात सहज शिरू शकतील यासाठी तिने घराचा मुख्य दरवाजा मुद्दाम उघडा ठेवला होता. मात्र, महिलांच्या प्रतिकारामुळे हा कट फसला. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक जण मेकॅनिकल इंजिनिअर असून दुसरा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे.
advertisement
'दृश्यम' स्टाईलने खून आणि गुंगारा देण्याचा प्रयत्न: दुसरीकडे, विश्रांतवाडी परिसरातून बेपत्ता असलेल्या एका १७ वर्षीय मुलाचा निर्घृण खून झाल्याचे उघड झाले आहे. खेड शिवापूर परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका मुलीच्या माध्यमातून त्याला बोलावून घेण्यात आले आणि त्यानंतर चाकूने गळा चिरून व दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली. आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी 'दृश्यम' चित्रपटाप्रमाणे मुलाचा मोबाईल एका ट्रकवर फेकून दिला होता, जेणेकरून त्याचे लोकेशन वेगळ्या ठिकाणी दिसावे. मात्र, पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 1:06 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
प्रियकराच्या घरभाड्यासाठी पुण्यातील मुलीचं धक्कादायक कांड; काकाच्या घराचा दरवाजा ठेवला उघडा, पुढच्याच क्षणी...









