Farmer Success Story : पारंपारिक शेतीला फाटा देत पिकवलं नारंगी सोनं! अन् शेतकरी झाला मालामाल

Last Updated:

Agriculture News: पारंपारिक शेतीतील अनिश्चिततेला मागे टाकत अनेक शेतकरी आता आधुनिक पद्धतीने नगदी पिके घेण्यास प्राधान्य देत आहेत. कमी पाण्यात अधिक उत्पन्न मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्यानगर येथील अशोक टेमकर.

News18
News18
मुंबई : पारंपारिक शेतीतील अनिश्चिततेला मागे टाकत अनेक शेतकरी आता आधुनिक पद्धतीने नगदी पिके घेण्यास प्राधान्य देत आहेत. कमी पाण्यात अधिक उत्पन्न मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्यानगर येथील अशोक टेमकर. त्यांनी आपल्या अडीच एकर संत्रा बागेतून दरवर्षी 10 लाख रुपयांचा नफा कमावण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.
मर्यादित पाण्यात भरघोस उत्पादन
भोसेगाव (अहिल्यानगर) परिसरात सरासरी 350 ते 400 मिमी पावसाचे प्रमाण असते,त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा नाहीत.त्यामुळे या भागातील शेतकरी पारंपारिक पिकांवर अवलंबून होते. मात्र, मागील काही वर्षांत फळबाग शेतीने या भागाला नवे अर्थकारण दिले. विशेषतः डाळिंब आणि संत्रा शेतीने चांगला प्रतिसाद मिळवला. अशोक टेमकर यांनी ही संधी ओळखून संत्रा लागवडीला प्राधान्य दिले आणि त्यातून मोठा आर्थिक लाभ मिळवला.
advertisement
संत्रा शेतीने दिले आर्थिक बळ
अशोक टेमकर यांच्या 16 एकर शेतीपैकी अडीच एकरवर त्यांनी सुमारे ७५० संत्र्याची झाडे लावली आहेत.आधुनिक पद्धतीने 12x12 फूट अंतरावर लागवड केल्याने झाडांना पुरेसा वाव मिळतो आणि उत्पादन चांगले येते. प्रत्येक झाड सरासरी 40 ते 60 किलो संत्रे देते.एका हंगामासाठी साधारणतः अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च येतो. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च कमी असल्याने यंदा 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला.
advertisement
स्थानिक बाजारपेठ आणि व्यापारास चालना
फळबाग शेती वाढल्याने गावातच व्यापारी उपलब्ध होत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारपेठेचा फायदा मिळत आहे. या भागातील संत्र्यांची गुणवत्ता उत्तम असल्याने त्यांना मुंबई, दिल्ली आणि दक्षिण भारतातील बाजारपेठेत मोठी मागणी आहे. व्यापाऱ्यांना थेट शेतातून माल घेता येत असल्याने वाहतूक खर्चही कमी होतो आणि त्यांना अधिक नफा मिळतो.
advertisement
फळबाग शेती,शाश्वत उत्पन्नाचा मार्ग
पारंपारिक शेतीत वारंवार येणाऱ्या संकटांमुळे नगदी पिके आणि फळबाग लागवड हा अधिक फायदेशीर पर्याय ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story : पारंपारिक शेतीला फाटा देत पिकवलं नारंगी सोनं! अन् शेतकरी झाला मालामाल
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement