advertisement

Success Story: नोकरीत काय आहे? उच्चशिक्षित तरुणाने घेतल्या 10 गायी, आता कमतोय पैसाच पैसा! Video

Last Updated:

Success Story: उच्चशिक्षित आकाश पोपळे या तरुणाने नोकरीच्या मागे न जाता व्यवसायात उतरला. यातून वर्षाकाठी 10 ते 15 लाख रुपयांची उलाढाल होत आहे.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : उच्चशिक्षित आकाश पोपळे या तरुणाने नोकरीच्या मागे न जाता व्यवसायात उतरला, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील हिवरा गावात गाय पालनाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करून महिन्याला दीड लाख रुपयांची कमाई करत आहे. त्यांच्याकडे मूळच्या नेदरलँड्स आणि जर्मनीमधील असलेल्या होल्स्टीन-फ्रिजियन या प्रजातीच्या 9 ते 10 गायी आहेत. यातून दिवसभरात दोन वेळा 120 लिटर दूध काढून त्याची विक्री केली जाते, यातून वर्षाकाठी 10 ते 15 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे आकाशने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
गाय पालनाचा आणि दुग्ध व्यवसाय आकाशचे वडील आबासाहेब पोपळे यांनी सुरू केलेला, तोच व्यवसाय पुढे त्यांचा मुलगा पाहतो. दुग्ध व्यवसायातून साधारणपणे दररोज 4 ते 5 हजारांची उलाढाल होत असते, आणि महिन्याची कमाई 1 ते दीड लाखांपर्यंत होत असते. गायींच्या चारा-पाण्यासाठी कांडी गवत, मक्का, मुरघास त्यांना खाण्यासाठी देण्यात येतो.
advertisement
दररोज सकाळी 3 वाजल्यापासून कामे सुरू होतात, शेण काढणे, दूध काढणे, जनावरांना चारा-पाणी करणे तसेच संध्याकाळी देखील शेण काढणे, दूध काढणे ही सर्व प्रक्रिया सुरू असते. गाय पालन आणि दुग्ध विक्री हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. इतर खाजगी ठिकाणी कमी पगारात काम करण्यापेक्षा तरुणांनी स्वतःचाच व्यवसाय जर केला तर त्यातून चांगली कमाई होते
advertisement
नोकरी करून 10 ते 12 हजार रुपयांच्या पगारासाठी धडपडण्यापेक्षा दुग्ध व्यवसायात महिन्याला मिळणारे उत्पन्न हे अधिक समाधानकारक आणि सुरक्षित आहे, असे देखील यावेळी आकाशकडून सांगण्यात आले आहे. या तरुणाने दुग्ध व्यवसायात घेतलेली ही मोठी झेप परिसरातील शेतकरी आणि तरुणांना देखील स्वयंपूर्ण बनवण्याची प्रेरणा देत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story: नोकरीत काय आहे? उच्चशिक्षित तरुणाने घेतल्या 10 गायी, आता कमतोय पैसाच पैसा! Video
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement