शेतकऱ्याला सापडला यशाचा मंत्र, अशी केली शेती, वर्षात लखपती! Video
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात काजळी या गावात देशमुख कुटुंब हे गेल्या कित्येक वर्षांपासून शेती करत आहेत. त्यांच्या शेतात हळद, आले, कलिंगड, संत्रा, हरभरा आणि बरेच पिकं त्यांच्या शेतामध्ये आहेत.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : अमरावती जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त शेतकरी शेतीमध्ये एक पीक पद्धती वापरतात. त्यामुळे नेहमीच खर्च आणि उत्पन्न याचा मेळ लागत नाही. त्यामुळे काही तरुण शेतकरी आता बहुपिक पद्धतीचा अवलंब करत आहेत. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात काजळी या गावात देशमुख कुटुंब हे गेल्या कित्येक वर्षांपासून शेती करत आहेत. त्यांच्या कुटुंबातील मयूर देशमुख हे बहुपीक पद्धतीने शेती करतात. त्यांच्या शेतात हळद, आले, कलिंगड, संत्रा, हरभरा आणि बरेच पिकं त्यांच्या शेतामध्ये आहेत.
advertisement
अमरावतीमधील चांदूर बाजार तालुक्यातील काजळी या गावात देशमुख कुटुंब गेले कित्येक वर्ष शेती करत आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती ही 35 एकर आहे. त्यातील 15 एकर शेती हे मयूर प्रविण देशमुख सांभाळतात. वर्षभरात ते शेतामध्ये विविध हंगामी पिकांची लागवड करतात. या वर्षी त्यांच्याकडे कपाशी, संत्रा, गहू, हरभरा, कलिंगड, हळद, अद्रक ही पिकं होती. सध्या शेतात गहू, हरभरा, संत्रा, अद्रक आणि कलिंगड हे पिकं आहेत.
advertisement
मयूर देशमुख यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला तेव्हा ते सांगतात की, आम्ही आधी एकाच पिकाच्या मागे वर्षभर राहत होतो. त्यातून पाहिजे तसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे मग मी बहुपीक पद्धती वापरण्यास सुरुवात केली. त्यामध्ये एका पिकाची हार्वेस्टिंग झाल्यानंतर दुसरे पिकं सध्या मी घेत आहे.
advertisement
15 एकर शेतीचे नियोजन
15 एकराचे नियोजन असे केले की, 7 एकरमध्ये हरभरा आहे त्यात आधी कपाशी होती. 6 ते 7 एकरमध्ये गहू हे पिकं आहे. अद्रक हे जास्त कालावधीचे पिक असल्याने ते वर्षभर राहते. कलिंगड लागवड केली. ती पावणे एकरमध्ये आहे. त्याचबरोबर अद्रक हे अर्धा एकर मध्ये आहे.
दरवर्षी होणारे उत्पन्न
1. अद्रक अर्धा एकरमध्ये 25 क्विंटल
advertisement
2. टरबूज पावणे एकर 20 टन
3. हरभरा एकरी 12 क्विंटल
असे काही उत्पन्न बहुपीक पद्धती वापरल्याने मला होत आहे. यातून वर्षभर पैशाची आवक सुरू राहते. लागवड खर्च आणि उत्पन्न याचा मेळ साधता येतो, असे मयूर देशमुख यांनी सांगितले.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
Jan 31, 2025 3:12 PM IST








