केळीच्या खोडव्यापासून मिळेल दर्जेदार उत्पादन, खोडवा व्यवस्थापनासाठी 2 महत्त्वाच्या टिप्स, पाहा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
खोडवा व्यवस्थापन हे केळी उत्पादनातील आधुनिक तंत्र आहे. यामुळे पूर्वमशागत आणि रोप लागवडीच्या खर्चामध्ये बचत होते. योग्य व्यवस्थापन केल्यास मागणीपेक्षा खोडव्यातून अधिक उत्पन्न मिळवता येते.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली: उतीसंवर्धित रोपे आणि केळीच्या लागवड खर्चात वाढ झाल्याने आपल्याकडे बरेच शेतकरी केळी पिकाचा खोडवा घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. केळी खोडवा व्यवस्थापनातून अधिक आणि दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयीच प्रयोगशील शेतकरी शिवाजी वाटेगावकर यांनी माहिती दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते निर्यात क्षम केळीचे उत्पादन घेतात. वाटेगावकर यांनी दोन महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या.
advertisement
केळी खोडवा पिकातून अधिक आणि दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिलाची किंवा खुंटाची निवड होय. केळीच्या पहिल्या खोडव्यापासून अधिक दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी पहिले पीक घेतल्यानंतर दोन महिन्यांनी एक जोमदार पिल/ खुंट (मुनवा) सोडावे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पहिल्या पिकाला सोडलेल्या पिलापासून काही नुकसान होत नाही. खोडवा खुंट निवडताना मातृ खुंटापासून अर्धा फूट लांब अंतरावर असणारा जोमदार खुंट निवडावा.
advertisement
मुख्य केळी पिकाचे घड कापणी केलेले खोड आहे तसेच ठेवावे. फक्त शेंड्याला दोन पाने ठेवून इतर सर्व पाने कापून त्यांचा आच्छादन म्हणून वापर करावा. त्यामुळे मूळ खोडातील उपयुक्त अन्नद्रव्ये खोडवा पिकास मिळतात. परिणामी कमी खर्चात अधिक आणि दर्जेदार उत्पादन मिळते. तसेच केळीची इतर पिले धारदार विळ्याने नियमित कापून टाकावीत. रोगग्रस्त पाने कापून शेताबाहेर नष्ट करावीत. हिरवी निरोगी पाने कापू नयेत.
advertisement
केळी खोडवा पिकाचे फायदे
खोडवा पद्धतीचा अवलंब केल्यास पूर्वमशागत, रोपे, नवीन लागवडीचा खर्च करावा लागत नाही.
मातृपिकाची सारी पोषण यंत्रणा त्याच जागी खोडवा पिकास मिळते.
परिणामी, पिकाची वाढ लवकर होते. पीक लवकर तयार होते.
खोडवा पिकाचे उत्पादन पहिल्या पिकापेक्षा निश्चितपणे अधिक मिळते.
खोडवा पद्धतीचा अवलंब केल्यास पूर्वमशागतीच्या खर्चासह रोपांचा खर्च यासह लागवड आणि औषधांच्या खर्चामध्ये बचत होते. शिवाय मातृपिकाची सगळी पोषण यंत्रणा त्याच जागी खोडवा पिकास मिळते. तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्यवेळी योग्य व्यवस्थापन करत राहिल्यास, खोडवा पिकातून अधिक उत्पन्न मिळत असल्याचा अनुभव वाटेगावकर यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितला.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
January 27, 2025 3:47 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
केळीच्या खोडव्यापासून मिळेल दर्जेदार उत्पादन, खोडवा व्यवस्थापनासाठी 2 महत्त्वाच्या टिप्स, पाहा Video

