शेतकऱ्यांनो सावधान! अधिकऱ्यांची वेषांतर करत धडक कारवाई, 20 लाखांचे कपाशी बियाणे केली जप्त
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कृषी विभागाने बनावट कपाशी बियाण्याच्या प्रकरणावर मोठी कारवाई करत तब्बल २० लाख रुपयांचे बनावट बियाणे जप्त केले आहे.
धुळे : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कृषी विभागाने बनावट कपाशी बियाण्याच्या प्रकरणावर मोठी कारवाई करत तब्बल २० लाख रुपयांचे बनावट बियाणे जप्त केले आहे. ही कारवाई विशेष म्हणजे गुप्त पद्धतीने आणि वेषांतर करून करण्यात आली आहे, ज्यामुळे बनावट बियाणे विक्रेत्यांना कोणताही संशय येऊ नये.
गुप्त माहितीवरून गाठले ठिकाण
कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही व्यक्ती खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून बनावट कपाशी बियाणे वाहून नेत आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्वरित यंत्रणा सक्रिय केली. अधिकाऱ्यांनी सामान्य प्रवाशांसारखे वेष घेत, त्या ट्रॅव्हल्सच्या मागावर नजर ठेवली. योग्य वेळी कारवाई करत त्यांनी बियाण्याचे तपशील तपासले आणि त्यामध्ये बनावट बियाण्याची 120 पाकिटे असल्याचे आढळून आले.
advertisement
बनावट बियाण्यांची शहानिशा सुरू
सध्या जप्त केलेल्या सर्व 120 पाकिटांची शास्त्रीय तपासणी केली जाणार आहे. यासाठी बियाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले गेले आहेत. अहवालानंतरच बियाणे बनावट असल्याचे शास्त्रशुद्ध निष्कर्ष स्पष्ट होतील. मात्र, पहिल्या तपासणीत ही पाकिटे मंजूर नसलेल्या कंपन्यांची, बोगस लेबले लावलेली आणि नोंदणीशिवाय विक्रीसाठी आणलेली असल्याचे दिसून आले आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक टळली
या कारवाईमुळे शेतकऱ्यांची मोठ्या आर्थिक नुकसानातून सुटका झाली आहे. कपाशी हे अनेक शेतकऱ्यांचे मुख्य पीक असून, बियाणे चुकीचे असल्यास उत्पन्नावर मोठा परिणाम होतो, त्यातून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडते. त्यामुळे कृषी विभागाची ही वेळेवर केलेली कारवाई शेतकऱ्यांच्या हिताची आहे.
advertisement
आरोपींविरोधात गुन्हा दाखल होणार
या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरोधात लवकरच फसवणूक, बियाणे कायद्याचे उल्लंघन आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न याखाली गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडून तपास सुरू आहे आणि यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, कपाशी बियाणे खरेदी करताना नेहमी लायसन्सधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे घ्यावे, बियाण्याच्या पाकिटावरील कंपनीचे नाव, बॅच नंबर, उत्पादन व मुदत समाप्ती तारीख नीट तपासावी. कोणतेही संशयास्पद बियाणे आढळल्यास त्वरित नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 02, 2025 11:14 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांनो सावधान! अधिकऱ्यांची वेषांतर करत धडक कारवाई, 20 लाखांचे कपाशी बियाणे केली जप्त