दिवाळीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! आर्थिक मदत देण्यास सुरुवात, विभागनिहाय किती पैसे मिळणार?

Last Updated:

Maharashtra Flood : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड या सात जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आर्थिक मदत वितरण करण्यास सुरूवात केली आहे.

agriculture news
agriculture news
मुंबई : दिवाळीत शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड या सात जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आर्थिक मदत वितरण करण्यास सुरूवात केली आहे. या जिल्ह्यांतील एकूण २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याने १३५६ कोटी ३० लाख २२ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीस मंजुरी देण्यात आली आहे.
याशिवाय, जुलै आणि ऑगस्ट २०२५ या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीबाबतही १,३३९ कोटी ४९ लाख २५ हजार रुपयांच्या मदतीला मान्यता देण्यात आली आहे.
सप्टेंबरमधील पुरग्रस्त जिल्ह्यांना मिळणारी मदत
सातारा जिल्हा: ६.२९ कोटी रु
धाराशिव: ३.१८ कोटी रु
advertisement
बीड: २९२.४९ कोटी रु
लातूर: २४५.६४ कोटी रु
परभणी: ५७७.७८ कोटी रु
नांदेड: ३११.२९ कोटी रु
कोल्हापूर: २०२.३८ कोटी रु
या जिल्ह्यांमध्ये १५ लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सरकारने या सर्वांना थेट खात्यात मदत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
जुलै-ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी विभागनिहाय मदत
अमरावती विभाग : अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील ७,८८,९७४ शेतकऱ्यांना ६,५४,५९५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ५६५ कोटी ६० लाख ३० हजार रु
advertisement
नागपूर विभाग: गोंदिया, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांतील ३७,६३१ शेतकऱ्यांना, २१,२२४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २३ कोटी ८५ लाख २६ हजार रु
पुणे विभाग: कोल्हापूर जिल्ह्यातील ३६,५५९ शेतकऱ्यांना ८,८३५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १४ कोटी २८ लाख ५२ हजार रु
छत्रपती संभाजीनगर विभाग: हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील १० लाख ३५ हजार ६८ शेतकऱ्यांना ८ लाख ४८ हजार ४४५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ७२१ कोटी २७ लाख ८६ हजार रु
advertisement
नाशिक विभाग: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांतील २४,६७७ शेतकऱ्यांना १२,१४९ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १३ कोटी ७७ लाख ३१ हजार रु
थेट जिल्हास्तरावरून मदत वितरण
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना, पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत आता थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही. यामुळे मदत त्वरित आणि कार्यक्षम पद्धतीने वितरित होईल.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
दिवाळीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! आर्थिक मदत देण्यास सुरुवात, विभागनिहाय किती पैसे मिळणार?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement