Rangoli Design : धनत्रयोदशीच्या दिवशी दारासमोर काढा सुंदर रांगोळी! पाहा खास डिझाइन्स..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Dhantrayodashi Rangoli Design : आनंदी आणि उत्साहाचा उत्सवी काळ सुरू झाला आहे आणि जगभरातील लोक मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करण्याची तयारी करत आहेत. हिंदू धर्मात या पाच दिवसांच्या सणाला खूप धार्मिक महत्त्व आहे आणि याची सुरुवात धनत्रयोदशीने होते. यावर्षी धनत्रयोदशी शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे. आजच्या दिवशी घरासमोर सुंदर रांगोळी काढण्यासाठी काही छान डिझाईन देत आहोत.
advertisement
advertisement
धनत्रयोदशीची पूजा विधीपूर्वक केल्याने घरामध्ये सूख-शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते असे मानले जाते. त्यामुळे, ही पूजा योग्य पद्धतीने करण्याचा सल्ला दिला जातो. पौराणिक आख्यायिकेनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान धन्वंतरी हे समुद्रमंथनातून प्रकट झाले. त्यावेळी, त्यांच्या हातामध्ये अमृताने भरलेले पात्र होते अशी मान्यता आहे.
advertisement
advertisement