भारताने वसूल केली आशिया कप ट्रॉफीची किंमत, हाताखालून गेले 100 कोटी, नक्वीला पत्ताही लागला नाही!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये मोहसिन नक्वीच्या ट्रॉफी चोरी प्रकरणामुळे टीम इंडिया ट्रॉफीशिवाय मायदेशी परतली तरी, संपूर्ण स्पर्धेत मैदानावरील नाट्यमय घडामोडींचा बीसीसीआयला मोठा फायदा झाला.
मुंबई : आशिया कपमध्ये मोहसिन नक्वीच्या ट्रॉफी चोरी प्रकरणामुळे टीम इंडिया ट्रॉफीशिवाय मायदेशी परतली तरी, संपूर्ण स्पर्धेत मैदानावरील नाट्यमय घडामोडींचा बीसीसीआयला मोठा फायदा झाला. आशिया कपचं यजमान म्हणून बीसीसीआयला अंदाजे 100 कोटी रुपये (1.2 अब्ज डॉलर) फायदा झाला आहे. पाकिस्तानला आशिया कपच्या तीनही सामन्यांमध्ये भारताकडून पराभव पत्करावा लागला. हस्तांदोलन वादाला प्रतिष्ठेचा विषय बनवणाऱ्या नक्वी आणि पीसीबीच्या नाकाखालून बीसीसीआयने 100 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या 2025-26 च्या बजेट कागदपत्रांवरून असे दिसून येते की बोर्डाला या आर्थिक वर्षात अंदाजे ₹67 अब्ज (अंदाजे $1अब्ज) अतिरिक्त रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. आशिया कप होस्टिंग फी, मीडिया हक्क आणि आयसीसी टी20 वर्ल्ड कप या सर्वांमुळे बीसीसीआयच्या महसुलात लक्षणीय वाढ झाली. जरी आशिया कप वादात अडकला असला तरी, बीसीसीआयने शेवटी ट्रॉफीपेक्षा जास्त कमाई केली.
advertisement
मागील रेकॉर्डशी तुलना केल्यास, 2017-18 मध्ये, बीसीसीआयचा सरप्लस फक्त 666 कोटी होता, परंतु आता हा आकडा दहापट वाढून 67 अब्जपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. पण, आयपीएलचे घटते मूल्यांकन बीसीसीआयसाठी चिंतेचे कारण आहे. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की दोन वर्षांत आयपीएलचे मूल्य 16 हजार कोटींनी कमी झाले आहे.
advertisement
तरीही, बीसीसीआयने आयपीएलवरील आपले अवलंबित्व कमी केले आहे. आता बीसीसीआयच्या महसुलाचा एक महत्त्वाचा भाग आंतरराष्ट्रीय सामने, मीडिया हक्क आणि आयसीसीच्या शेअर्समधून येतो. सध्याच्या बजेटमध्ये, बोर्डाच्या सरप्लसच्या 76% आयपीएलमधून, 20% बीसीसीआयकडून आणि 4% महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल)मधून येतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 11:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारताने वसूल केली आशिया कप ट्रॉफीची किंमत, हाताखालून गेले 100 कोटी, नक्वीला पत्ताही लागला नाही!