Unseasonal Rain: अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या स्वप्नांचा केला चिखल, डाळिंब बागेचं 25 लाखांचं नुकसान, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
शेतकरी चंद्रकात ढगे यांचे डाळिंब बागेचे नुकसान झाले आहे. डाळींबाला लहानाचे मोठे करण्यासाठी चंद्रकांत ढगे यांनी लाखो रुपये खर्च केले पण अवकाळी पावसामुळे सर्व हिरावून घेतले आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मागील काही दिवसांपासून मुसळधार अवकाळी पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील शेतकरी चंद्रकात ढगे यांचे डाळिंब बागेचे नुकसान झाले आहे. डाळींबाला लहानाचे मोठे करण्यासाठी चंद्रकांत ढगे यांनी लाखो रुपये खर्च केले पण अवकाळी पावसामुळे सर्व हिरावून घेतले आहे.
हराळवाडी गावातील शेतकरी चंद्रकांत ढगे हे गेल्या 15 वर्षांपासून डाळिंबाची बाग करत आहेत. एका एकरात चंद्रकांत यांनी डाळिंबाची लागवड केली आहे. गेल्यावर्षी एक एकरातून 20 ते 22 लाखांचे उत्पन्न सर्व खर्च वजा करून मिळाले होते. या वर्षी फवारणी, खते इत्यादी मिळून 5 ते 6 लाख रुपये खर्च चंद्रकांत ढगे यांनी केला होता. परंतु या अवकाळी पावसामुळे चंद्रकांत यांना 20 ते 25 लाखांचा नुकसान झालं आहे.
advertisement
चंद्रकांत ढगे यांच्या डाळिंबाला उत्कृष्ट कॉलेजचे डाळिंब लागले होते. परंतु मे महिन्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे डाळिंबाचे झाड फळ तुटून पडले आहे. तर या अवकाळी पावसामुळे डाळिंब बागेत तेल्या, करपा, तसेच बुरशीजन्य रोगाचे प्रमाण हे वाढत आहे. डाळिंबच्या बागेला या रोगापासून वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी देखील करावी लागत आहे.
advertisement
आधीच बाजारात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे सूर्य असलेल्या अवकाळी पावसामुळे फळबागेचे तसेच पालेभाज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी चंद्रकांत ढगे यांनी केली आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
May 31, 2025 10:03 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Unseasonal Rain: अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या स्वप्नांचा केला चिखल, डाळिंब बागेचं 25 लाखांचं नुकसान, Video