Horoscope Today: भयंकर अडचणींमधून वाट काढली! या 5 राशींच्या प्रयत्नांना आता यश; गुरू-शनी मेहरबान
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, September 17, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
मेष (Aries) : आज बुधवारचा दिवस उत्साह वाढवणारा तसेच नवीन शक्यतांचा असेल. कामात दिवसभर तुम्ही उत्साही आणि सकारात्मक असाल. त्याचा परिणाम तुमच्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तींवर देखील होईल. विचार स्पष्टपणे मांडा. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना सहकार्य करा. तुमचा मनमोकळेपणा नवीन भागीदारीसाठी फायदेशीर ठरू शकतो. नवीन नातं सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. आरोग्य सामान्य असेल. थोडी शारीरिक हालचाल केली तरी उत्साह वाढेल. तुम्ही खूप सकारात्मक असाल. कामात आणि नातेसंबंधांत देखील सकारात्मकता जाणवेल.
Lucky Color : Red
Lucky Number : 7
Lucky Color : Red
Lucky Number : 7
advertisement
वृषभ (Taurus) : डोक्यातील गोंधळ शांत करण्यासाठी आजचा दिवस समर्पण आणि आत्मपरीक्षणाचा आहे. तुम्हाला तुमच्या मनातील भावना आणि इच्छांची जाणीव होईल. महत्त्वाचे निर्णय घेण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यासाठी आधी मनाची तयारी करावी लागेल. व्यावसायिक कामात सकारात्मक बदल दिसू शकतात. आरोग्यासाठी ध्यानधारणा आणि योग करा. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी वेळ काढा. नवीन ओळखी करा. नवीन मैत्री आणि सहकार्यासाठी दिवस चांगला आहे. नवीन शक्यतांकडे वाटचाल करा. आत्मविश्वासाने पुढे जा.
Lucky Color : Blue
Lucky Number : 3
Lucky Color : Blue
Lucky Number : 3
advertisement
मिथुन (Gemini) : दिवस काहीतरी नवीन घेऊन आला आहे, त्यामुळे कामात चांगला बदल दिसेल. आज तुमचं बोलणं परिणामकारक ठरेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात स्पष्टता ठेवा. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी सर्वांगीण विचार करा. आरोग्याची काळजी घ्या. जास्त शारीरिक हालचाली टाळाव्यात. सकारात्मक विचार आणि संयम ठेवला तर दिवसाचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल. सर्जनशील कार्यात हात आजमवण्यासाठी दिवस चांगला आहे. उत्सुकता वाढल्याने नवीन गोष्टी शिकण्यास आणि अनुभव घेण्यास प्रेरणा मिळेल. दिवस आनंद वाढवणारा असेल.
Lucky Color : White
Lucky Number : 11
Lucky Color : White
Lucky Number : 11
advertisement
कर्क (Cancer) : आज अडचणी आहेत, ऑफिसमध्ये आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पण आत्मविश्वास कायम ठेवा. ऐकून घेण्याचे कौशल्य वापरले तर सहकाऱ्यांशी चांगला संवाद साधू शकाल. वैयक्तिक संबंधात चढ-उतार होऊ शकतो. संयम ठेवा आणि कुटुंबियांच्या भावना समजून घ्या. आरोग्य चांगले राहील. पण आराम करण्यासाठी थोडा वेळ काढा. योग किंवा ध्यानधारणा केल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल. आर्थिक बाबतीत सकारात्मक संकेत मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. दिवस नवीन गोष्टी शिकण्याची आणि विकासाची संधी देईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवत संधी ओळखा.
Lucky Color : Pink
Lucky Number : 9
Lucky Color : Pink
Lucky Number : 9
advertisement
सिंह (Leo) : कामात अडचणी असतील पण, तुम्ही आव्हानांचा सामना करण्यास तयार असाल. सहकारी तुम्हाला प्रोत्साहन देतील. काही नवीन कल्पना किंवा नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते. वैयक्तिक जीवनात कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्यास समाधान मिळेल. त्यांच्या सहवासात तुम्हाला आनंद मिळेल. आरोग्यविषयक किरकोळ समस्या त्रासदायक ठरू शकतात. त्यासाठी योग आणि व्यायाम करा. ध्यानधारणा केल्यास मानसिक शांती मिळेल. स्वप्नपूर्तीसाठी योग्य दिशेने वाटचाल करा. संयम कायम ठेवा. लोक तुमच्या विचाराने प्रभावित होतील. आनंदी राहा.
Lucky Color : Red
Lucky Number : 18
Lucky Color : Red
Lucky Number : 18
advertisement
कन्या (Virgo) : विविध कामांसाठी दिवस शुभ आहे. आज बुधवारी मेहनत आणि समर्पणाचे फळ मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल. सामाजिक जीवनात नवीन ओळखी होतील. भविष्यात या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. आरोग्याबाबत सावध रहा. खर्च वाढू शकतो, विचारपूर्वक पैसे खर्च करा. नात्यात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. नवीन गोष्टी केल्यास किंवा छंद जोपासल्यास तुमची सकारात्मक वाढेल.
Lucky Color : Orange
Lucky Number : 12
Lucky Color : Orange
Lucky Number : 12
advertisement
तूळ (Libra) : प्रगतीच्या मार्गावर पुढचं पाऊल टाकण्याचा दिवस आहे. तुमचे विचार आणि भावना स्पष्ट असतील. त्यामुळे तुम्ही ध्येयाकडे वाटचाल करू शकाल. करिअरमध्ये नवीन शक्यता दृष्टिपथात येतील. नवीन कल्पना आणि योजना शेअर करा. समोरच्या व्यक्तीचं बोलणं समजून घ्या. जुन्या समस्येचं निराकरण करण्याची संधी मिळाल्याने संबंध सुधारतील. संध्याकाळी योग किंवा ध्यानधारणा करणं फायदेशीर ठरेल. त्यामुळे मानसिक शांती आणि समतोल साधता येऊ शकेल. सहकार्य आणि सुसंवादाची भावना महत्त्वाची असेल. सकारात्मक विचार करा आणि हेतुंवर ठाम रहा.
Lucky Color : Gray
Lucky Number : 2
Lucky Color : Gray
Lucky Number : 2
advertisement
वृश्चिक (Scorpio) : बुधवारचा दिवस महत्त्वाचा असेल. टीमवर्कमध्ये तुम्ही चांगले काम करू शकाल. निर्णय क्षमता आणि स्पष्टतेच्या जोरावर अनेक समस्या सोडवाल. आर्थिक सुधारणा होऊ शकते. त्यामुळे आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या. वैयक्तिक संबंध सुधारतील. प्रियजनांसोबत वेळ घालवल्यानं आनंद आणि समाधान मिळेल. आरोग्यासाठी थोडा वेळ द्या. योग किंवा ध्यानधारणा केल्याने मानसिक शांती आणि ऊर्जा वाढेल. दिवस सकारात्मक आणि प्रेरणादायी असेल. आत्मविश्वास कायम ठेवा. नवीन संधीचा लाभ घेण्यासाठी तयार रहा.
Lucky Color : Peach
Lucky Number : 4
Lucky Color : Peach
Lucky Number : 4
advertisement
धनू (Sagittarius) : आज बुधवारचा दिवस नवीन आव्हाने आणि संधीचा असेल. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्यास आनंद मिळेल. जुन्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असाल तर संवाद आणि समजुतीतून यश मिळेल. कार्यक्षेत्रात कष्ट घ्यावे लागतील. मेहनतीचे फळ मिळेल. नवीन कल्पना आणि योजनांवर लक्ष केंद्रित करा. यामुळे ध्येय साध्य करू शकाल. आरोग्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करा. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. ध्यानधारणा किंवा योगासने करा. दिवस नवीन संधी आणि सकारात्मक अनुभव देणारा आहे. आत्मपरीक्षण करत ध्येयाकडे वाटचाल करा.
Lucky Color : Navy Blue
Lucky Number : 17
Lucky Color : Navy Blue
Lucky Number : 17
advertisement
मकर (Capricorn) : आज बुधवारचा दिवस नवीन संधी देणारा आहे. कामात चांगले बदल दिसू शकतात. एखाद्या कामावर दीर्घकाळ मेहनत घेत असाल तर त्याचे फळ आता मिळू शकते. अडकलेले पैसे मिळू शकतात. योग्य निर्णय घेतल्यास आर्थिक फायदा होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा, अनावश्यक खर्च टाळा. आरोग्यासाठी संतुलित आहार घ्या. नियमित व्यायाम करा. मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा किंवा योगाभ्यास करा. दिवस सकारात्मक आणि विकासाचा असू शकतो.
Lucky Color : Yellow
Lucky Number : 11
Lucky Color : Yellow
Lucky Number : 11
advertisement
कुंभ (Aquarius) : नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. विचार आणि कल्पना मांडण्यास उत्सुक असाल. सामाजिक कार्य आणि नवीन मित्र जोडण्यासाठी दिवस अनुकूल आहे. सर्जनशीलता व्यक्त करा. करिअरमध्ये नवीन जबाबदारी किंवा प्रकल्प मिळू शकतो. यात तुम्हाला तुमचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. धीर धरा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. वैयक्तिक जीवनात प्रियजनांसोबत वेळ घालवू शकाल. कुटुंब किंवा मित्रांसोबत संवाद साधल्याने तुमचं नातं घट्ट होईल. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. योगा आणि ध्यानधारणा करा. मनाचा आवाज ऐका आणि सकारात्मक राहा.
Lucky Color : Green
Lucky Number : 16
Lucky Color : Green
Lucky Number : 16
advertisement
मीन (Pisces) : मीन राशीच्या लोकांना आज बुधवारचा दिवस नवीन शक्यतांचा असेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते. त्यामुळे तुमच्या कामाचा वेग वाढेल. कल्पना शेअर करा, तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. आर्थिक बाबतीत सतर्क रहा. बजेटची काळजी घ्या. आरोग्यासाठी दिनचर्येत योग आणि ध्यानधारणेचा समावेश केल्यास मानसिक शांती मिळेल आणि तुमची ऊर्जा वाढेल. दिवस प्रेरणादायी आणि सकारात्मक अनुभव देणारा आहे. कामांचा धडाका लावाल, थोडी विश्रांतीही घ्याल.
Lucky Color : Purple
Lucky Number : 6
Lucky Color : Purple
Lucky Number : 6