सिद्धार्थ जाधवही झाला गौतमी पाटीलचा जबरा फॅन! म्हणाला, 'तिचा एक ऑरा...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Siddharth Jadhav on Gautami Patil : सिद्धार्थला गौतमी पाटीलमधील एक गोष्ट प्रचंड आवडली आहे.दोघांनी 'आतली बातमी फुटली' या सिनेमातील 'सखुबाई' गाण्यात एकत्र काम केलं.
मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधवचा आतली बातमी फुटली हा नवा मराठी सिनेमा येत्या 19 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. कथा एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती फिरणारी सिनेमाची स्टोरी फारच इन्ट्रेस्टिंग आहे. या सिनेमात सिद्धार्थनं केवळ अभिनय नाही तर थेट गौतमी पाटीलबरोबर डान्स केला आहे. सिनेमात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांच्यासहच सिद्धार्थला गौतमी पाटीलमधील एक गोष्ट प्रचंड आवडली आहे.
गौतमी पाटीलची लोकप्रियता संपूर्ण महाराष्ट्रात आहे. स्टेज डान्सर असलेली गौतमी आता सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर देखील झळकू लागली आहे. गौतमीची अनेक गाणी मधल्या काळात रिलीज झालीत. तिचं खास गाणं असलेला आतली बातमी फुटली या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
advertisement
या सिनेमात गौतमी आणि सिद्धार्थ जाधव यांच्यावर 'सखूबाई'हे झक्कास गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. एका मुलाखतीत गौतमीचं कौतुक करत सिद्धार्थ म्हणाला, "आमची टेक्निकल टीम कमालच आहे. सेट एका दिवसात केला. ते गाणं आम्ही एका रात्रीत केलं आहे. पण तो सेटअप बघितला तर तुम्हाला वाटणार नाही. आम्ही हे गाणं खूप मेहनतीने केलं."
advertisement
सिद्धार्थ पुढे म्हणाला, "गौतमीचा एक ऑरा आहे, छान आहे. मस्त आहे. मला छान का वाटतं कारण हे सगळे लोक आपल्या आयुष्यात छान काही अचिव्ह करतात, पण ते नम्र असतात. तो नम्रपणा खूप वर्क होतो. गौतमी पाटीलमध्ये तो नम्रपणा आहे. की दादा कसं झालं, दादा मॉनिटर बघूया. तू मस्त कर, चांगलं कर मी या लेव्हलला होतो."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 7:16 AM IST