advertisement

तुमची ग्रामपंचायत किती खर्च करते? सरकारकडून किती निधी मिळाला? 2 मिनिटांत करा चेक

Last Updated:

E GramSwaraj : आता प्रत्येक नागरिकाला आपल्या ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला आणि तो कोणत्या कामांवर खर्च झाला याची संपूर्ण माहिती ऑनलाइन पाहता येणार आहे.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : आता प्रत्येक नागरिकाला आपल्या ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला आणि तो कोणत्या कामांवर खर्च झाला याची संपूर्ण माहिती ऑनलाइन पाहता येणार आहे. केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या ई-ग्रामस्वराज (eGramSwaraj) पोर्टल आणि मोबाईल ॲपद्वारे ग्रामपंचायतीच्या आर्थिक प्रगतीचा तपशील सहज मिळतो. गाव पातळीवर विकासकामांमध्ये पारदर्शकता आणणे आणि नागरिकांचा विश्वास वाढवणे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.
निधी खर्चाची पारदर्शकता
ग्रामपंचायतीचा कोणताही खर्च सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहमतीशिवाय होऊ शकत नाही. त्याची संपूर्ण नोंद eGramSwaraj पोर्टलवर केली जाते. त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष ग्रामसभा किंवा कार्यालयात न जाता थेट मोबाईल किंवा संगणकावरून गावाच्या उत्पन्न-खर्चाची माहिती मिळू शकते.
माहिती कशी मिळवाल?
सर्वप्रथम पोर्टलला भेट द्या https://egramswaraj.gov.in/financialProgressReport.do
या संकेतस्थळावर जा.
गाव शोधा : तुमच्या ग्रामपंचायतीचा कोड किंवा नाव टाकून गाव निवडा.
advertisement
आर्थिक प्रगती पर्याय : "Financial Progress" या पर्यायावर क्लिक करा.
आर्थिक वर्ष निवडा : हवे असलेले आर्थिक वर्ष निवडा.
निधीचा तपशील पहा : त्या वर्षात ग्रामपंचायतीला किती निधी आला (Receipt) आणि तो कोणत्या कामावर खर्च झाला (Expenditure) हे स्पष्ट दिसेल.
निधी कुठून येतो?
ग्रामपंचायतींना निधी विविध मार्गांनी मिळतो जसे की,
केंद्र व राज्य सरकारकडून योजना आधारित निधी
advertisement
15 वा वित्त आयोग निधी : प्रत्येक व्यक्तीसाठी वार्षिक ठराविक रक्कम गावाला दिली जाते.
स्थानिक उत्पन्न स्रोत : जमीन महसूल, मालमत्ता कर, वाहन कर, उत्सवांवरून आकारला जाणारा कर, टोल व इतर स्थानिक उत्पन्न.
या रकमेचा वापर मुख्यतः पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रकाशयोजना, शैक्षणिक सुविधा आणि ग्रामविकासाच्या इतर उपक्रमांसाठी केला जातो.
मोबाईल ॲपमधूनही माहिती उपलब्ध
संगणकाव्यतिरिक्त मोबाईलवरूनही ही माहिती सहज पाहता येते. ई-ग्रामस्वराज ॲप गुगल प्ले-स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे.
advertisement
नागरिकांसाठी फायदे
प्रत्येक नागरिक आपल्या गावात मिळालेल्या निधीचा योग्य वापर होत आहे की नाही हे तपासू शकतो. विकासकामांची माहिती सार्वजनिक झाल्याने पारदर्शकता वाढते. भ्रष्टाचार आणि निधी गैरवापरावर नियंत्रण ठेवता येते. ग्रामसभेत प्रश्न मांडण्यासाठी नागरिकांना अचूक आकडेवारी मिळते.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
तुमची ग्रामपंचायत किती खर्च करते? सरकारकडून किती निधी मिळाला? 2 मिनिटांत करा चेक
Next Article
advertisement
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement