Micronutrient Spraying: शेतकऱ्यांनो, सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीचा पिकाला मोठा फायदा, फॉलो करा या टिप्स, कृषी तज्ज्ञांचा सल्ला

Last Updated:

बदलत्या वातावरणात पिकांना आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य देणे गरजेचे ठरते. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळाली तर पीक उत्पादनात 15 टक्क्यांची वाढ होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

+
News18

News18

सांगली: पावसाची उघडीप पाहून बरेच शेतकरी औषध फवारणीची कामे उरकतात. बदलत्या वातावरणात पिकांना आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य देणे गरजेचे ठरते. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळाली तर पीक उत्पादनात 15 टक्क्यांची वाढ होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीविषयी कृषी संशोधक डॉ.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे.
सूक्ष्म अन्नद्रव
कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथे मायक्रो ग्रेड सेकंड सूक्ष्म अन्नद्रव्य गेल्या वर्षभरापासून तयार केले जाते. यामध्ये लोह (Fe), जस्त (Zn), मॅंगनीज (Mn), तांबे (Cu), बोरॉन (B), मॉलिब्डेनम (Mo) घटकांचा समावेश केला आहे. भाजीपाला पिकांवरती पहिली फवारणी करताना प्रति 10 लिटर पाण्यामध्ये 100 मिली मायक्रो ग्रेड सेकंड तसेच दुसरी फवारणी करताना 10 लिटर पाण्यामध्ये 150 मिली मायक्रो ग्रेड सेकंड वावरण्याची शिफारस कृषी संशोधक डॉ.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी केली.
advertisement
कोणत्या पिकास किती फवारण्या 
ऊस पिकास 2 फवारणी
भाजीपाला पिकास 1 फवारणी
सोयाबीन, गहू आणि हरभरा पिकास 2 फवारणी
प्रमाण 
पहिली फवारणी करताना प्रति दहा लिटर पाण्यामध्ये शंभर मिलीमायक्रो ग्रेड सेकंड
दुसरी फवारणी करताना दीडशे मिली औषध वापरावे.
advertisement
सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांचे महत्व 
पिकांची वाढ
सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या अनेक रासायनिक प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात
उत्पादकता
सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या योग्य वापरामुळे पिकांची गुणवत्ता आणि उत्पन्न वाढते.
रोगप्रतिकारशक्ती
काही सूक्ष्म अन्नद्रव्ये, जसे की बोरॉन आणि तांबे, पेशींच्या भिंतींना बळकट करून रोगांपासून संरक्षण करतात.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Micronutrient Spraying: शेतकऱ्यांनो, सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीचा पिकाला मोठा फायदा, फॉलो करा या टिप्स, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement