ऑनलाइन पद्धतीने ‘फार्मर आयडी’ कसा काढायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Last Updated:

Famer id : देशभरातील शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ वेगाने व पारदर्शक पद्धतीने देण्यासाठी केंद्र सरकारने “फार्मर आयडी” (Farmer ID) ही महत्वाची योजना सुरू केली आहे.

Farmer id
Farmer id
मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ वेगानेपारदर्शक पद्धतीने देण्यासाठी केंद्र सरकारने “फार्मर आयडी” (Farmer ID) ही महत्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक स्वतंत्र डिजिटल ओळख क्रमांक दिला जातो, ज्याद्वारे त्यांच्या शेतीची माहिती, बँक खाते, जमिनीचे तपशील आणि शासकीय योजना लाभाची नोंद एका ठिकाणी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अर्ज किंवा सबमिशनसाठी अनेक कागदपत्रे सादर करण्याची गरज राहत नाही.
advertisement
फार्मर आयडी म्हणजे काय?
फार्मर आयडी हा एक डिजिटल ओळख क्रमांक आहे जो प्रत्येक शेतकऱ्याला एकदाच दिला जातो. या आयडीमध्ये शेतकऱ्याचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, जमीन सर्वेक्षण क्रमांक, शेतीचा प्रकार, पिकांची माहिती आणि बँक खाते तपशील अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टींची नोंद असते. हा आयडी केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी संबंधित सर्व योजनांशी जोडलेला असतो.
advertisement
ऑनलाइन फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर https://farmer.gov.in किंवा आपल्या राज्याच्या कृषी विभागाच्या agristack या पोर्टलला भेट द्या.
नंतर Farmer Registration” किंवा “नवीन शेतकरी नोंदणी” हा पर्याय निवडा. आपला आधार क्रमांक भरल्यानंतर “Get OTP” वर क्लिक करा. नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून प्रमाणीकरण करा. नाव, पत्ता, जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड इत्यादी माहिती अचूक भरा. ७/१२ उतारा किंवा जमीन सर्वेक्षण क्रमांक, शेती क्षेत्र, पिकांचा प्रकार, सिंचनाची पद्धत अशा तपशीलांची नोंद करा. बँक खाते क्रमांक, IFSC कोड, शाखेचे नाव आणि पासबुक प्रत अपलोड करा. आधार कार्ड, जमीन कागदपत्रे आणि छायाचित्र अपलोड करावे.
advertisement
सर्व माहिती तपासून अर्ज सादर करा. अर्ज सबमिट झाल्यानंतर एक नोंदणी क्रमांक मिळेल. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर शेतकऱ्यालाफार्मर आयडी” क्रमांक जारी केला जातो. हा क्रमांक मोबाईलवर SMS द्वारे कळवला जातो तसेच पोर्टलवरून प्रिंटही काढता येतो.
advertisement
फार्मर आयडीचे फायदे
शासकीय कृषी योजना, अनुदान, पीक विमा आणि पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळविणे सोपे होते. एकाच पोर्टलवर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती उपलब्ध राहते. फसवणूक आणि डुप्लिकेट अर्ज टाळले जातात. भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज, बियाणे, खत आणि विमा सेवांसाठी सुलभ प्रवेश मिळतो.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
ऑनलाइन पद्धतीने ‘फार्मर आयडी’ कसा काढायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement