Agriculture Success: इराण सोडा, आपल्या मराठवाड्यात पिकलं खजूर, 20 लाखांची होणार कमाई

Last Updated:

Dates Farming: इराण, इराकमध्ये पिकणारं खजूर प्रयोगशील शेतकऱ्यानं मराठवाड्यात पिकवलंय. शेतकरी राम चव्हाण यांनी कशी शेती केलीये? पाहुयात.

+
Agriculture

Agriculture Success: इराण सोडा, आपल्या मराठवाड्यात पिकलं खजूर, 20 लाखांची होणार कमाई

जालना: खजूर म्हटलं की आपल्याला इराण, इराक किंवा सौदी अरेबियासारखे आखाती देश आठवतात. परंतु, आता तंत्रज्ञान एवढं पुढं गेलंय की आखाती देशातील खजूर आपल्या मराठवाड्यात पिकतंय. जालना जिल्ह्यातील राम चव्हाण या शेतकऱ्याने 200 खजुराच्या झाडांची लागवड केली आहे. या झाडांना यशस्वीपणे खजूर देखील लगडले आहेत. तब्बल 20 लाख रुपयांचं उत्पन्न या शेतीमधून अपेक्षित आहे. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
जालना जिल्ह्यात जवळपास तीन ते चार शेतकऱ्यांनी आतापर्यंत खजुराची शेती यशस्वी करून दाखवलीये. यामध्ये घनसावंगी तालुक्यातील तणवाडी येथील शेंडगे कुटुंब देखील येतं. राम चव्हाण यांनी चार वर्षांपूर्वी 200 खजुराच्या झाडांची गुजरात येथून खरेदी केली. सुरुवातीची 100 झाडे 3800 रुपये प्रति झाड या पद्धतीने खरेदी केले. त्यानंतर झाडांची शॉर्टेज असल्याने 5200 रुपये प्रति झाड या पद्धतीने झाडांची खरेदी करावी लागली .
advertisement
कशी केली लागवड?
या झाडांची आपल्या तीन एकर शेतात 25 बाय 25 या अंतरावर लागवड करण्यात आली. चार वर्षानंतर या झाडांना मोठ्या प्रमाणावर खजूर लगडले आहेत. एका झाडाला साधारणपणे आठ गुच्छ लगडल्या असून एका गुच्छाच वजन साधारणपणे 15 किलोचा आसपास आहे.
advertisement
किती होणार कमाई?
किरकोळ बाजारात 200 रुपये प्रति किलो तर ठोक बाजारात 100 ते 150 रुपये प्रति किलो या दराने या खजुराची विक्री केली जाते. एका झाडापासून एक क्विंटल उत्पादन होणार असल्याने 100 रुपये प्रति किलो असा दर मिळाला तरी त्यांना एका झाडापासून 10 हजार रुपये एवढं उत्पन्न मिळणार आहे. तर 200 झाडापासून 18 ते 20 लाखांचे सरासरी उत्पन्न त्यांच्या हाती येणार आहे.
advertisement
शेतकऱ्यांनी खजुरासारखी नवनवीन पिकं घेतली पाहिजेत. शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग केले तरच हातामध्ये काही उरते. आपल्या इकडे या पिकाचं मार्केट तयार व्हायला आणखी वेळ लागेल. जेवढे जास्त शेतकरी या पिकामध्ये येतील तेवढ्या लवकर या पिकाचा बाजार तयार होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं, असं आवाहन राम चव्हाण यांनी केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture Success: इराण सोडा, आपल्या मराठवाड्यात पिकलं खजूर, 20 लाखांची होणार कमाई
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement