Property Rules : मालमत्ता खरेदी-विक्री नोंदणीसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय! एक राज्य, एक नोंदणी प्रणालीला होणार सुरवात
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
ek rajya ek nondani : मालमत्ता खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने दस्त नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत खरेदीदार आणि विक्रेता संबंधित जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दस्तनोंदणी करत होते. मात्र, अनेक वेळा या कार्यालयांतील गर्दीमुळे प्रक्रियेत विलंब होत असे. यावर उपाय म्हणून 'एक राज्य, एक नोंदणी' प्रणाली लागू केली जात आहे.
सोलापूर : मालमत्ता खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने दस्त नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत खरेदीदार आणि विक्रेता संबंधित जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दस्तनोंदणी करत होते. मात्र, अनेक वेळा या कार्यालयांतील गर्दीमुळे प्रक्रियेत विलंब होत असे. यावर उपाय म्हणून 'एक राज्य, एक नोंदणी' प्रणाली लागू केली जात आहे. ज्यामुळे राज्यातील कुठल्याही दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्त नोंदणी करणे शक्य होणार आहे. महसूल विभागाने या नव्या प्रणालीची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्याची तयारी सुरू केली आहे.
राज्यातील दस्तनोंदणी आणि महसूल संकलन
दरवर्षी राज्यात जवळपास तीन लाख दस्त नोंदणी होतात, ज्यातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. 2024 -25 या आर्थिक वर्षासाठी सरकारने 55,000 कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 2.41 लाख दस्त नोंदणीद्वारे 47,000 कोटी रुपये महसूल संकलित झाला आहे.
दस्त नोंदणी प्रक्रिया वेगवान होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवस, 100 कलमी कार्यक्रम'अंतर्गत महसूल विभागाला 10,000 कोटी रुपये अतिरिक्त महसूल संकलनाचे उद्दिष्ट दिले आहे. या अंतर्गत 'एक राज्य, एक नोंदणी' हा उपक्रम राबवण्यात येत असून, संबंधित सॉफ्टवेअरच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या बदलामुळे दस्तनोंदणी प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ होणार आहे.
advertisement
नवीन प्रणालीमुळे अपेक्षित बदल कोणते?
दस्त नोंदणीसाठी कोणत्याही जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातून प्रक्रिया करता येणार
नागरिकांना पूर्वीपेक्षा अधिक सोयीस्कर व वेगवान सेवा मिळणार
मुद्रांक शुल्क संकलनात वाढ होण्याची शक्यता
दरम्यान, नव्या आर्थिक वर्षापासून सुरू होणाऱ्या या प्रणालीमुळे दस्तनोंदणी प्रक्रियेत मोठा बदल होईल. स्वतंत्र सॉफ्टवेअरच्या मदतीने कुठल्याही जिल्ह्यातून नोंदणी करणे शक्य होणार आहे. यामुळे नागरिकांना अधिक लवचिकता मिळेल आणि व्यवहारांची प्रक्रिया जलद होईल. महसूल विभागाने या नव्या प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व आवश्यक तयारी सुरू केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 15, 2025 10:00 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Property Rules : मालमत्ता खरेदी-विक्री नोंदणीसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय! एक राज्य, एक नोंदणी प्रणालीला होणार सुरवात