PM Kisan च्या २१ व्या हत्याची अपडेट काय? पैसे कधी जमा होणार?

Last Updated:

PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या पीएम-किसान योजनेचा २१वा हप्ता काही राज्यांसाठी जाहीर झाला असून, पूर आणि भूस्खलनग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत मिळाली आहे.

pm kisan yojana
pm kisan yojana
मुंबई : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा २१वा हप्ता जाहीर करण्यात आला आहे. सध्या हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये थेट जमा झाले आहेत. या राज्यांमध्ये अलीकडेच झालेल्या पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून ही विशेष मदत दिली गेली आहे.
हप्ता कधी मिळणार? 
मागील २०व्या हप्त्यात देशभरातील ९.७ कोटी शेतकऱ्यांना तब्बल २० हजार ५०० कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. तथापि, या वेळेस ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच २१वा हप्ता मिळणार आहे. केंद्र सरकारने इतर राज्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा होणार असल्याचे संकेत दिले आहेत, मात्र अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
advertisement
ई-केवायसी अनिवार्य
पीएम-किसान योजनेनुसार प्रत्येक लाभार्थ्याने ई-केवायसी आणि बँक खाते पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. शासनाच्या नियमानुसार, हप्ते साधारणतः ४ ते ६ महिन्यांच्या अंतराने दिले जातात. मागील वर्षी १८वा हप्ता ५ ऑक्टोबर २०२४ रोजी, तर १९वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी वितरित झाला होता. याच पद्धतीनुसार २१वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित होता, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तो थोडा उशिरा दिला जात आहे.
advertisement
केंद्र सरकारच्या संकेतस्थळावरून शेतकरी आपला हप्ता स्टेटस तपासू शकतात. यासाठी पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकावा लागतो.
काही राज्यांचा हप्ता जमा
पूरग्रस्त प्रदेशांसाठी केंद्र सरकारने तत्काळ पाऊल उचलत २१व्या हप्त्याचे वितरण सुरू केले आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले आहेत, तर जम्मू-काश्मीरसाठी ७ ऑक्टोबर रोजी हा हप्ता जारी झाला. पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून ही रक्कम महत्त्वाची ठरत आहे. शासनाच्या मते, उरलेल्या राज्यांतील शेतकऱ्यांना जानेवारी २०२६च्या अखेरपर्यंत पैसे मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून लवकरच अधिकृत तारीख जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
तसेच शासनाच्या माहितीनुसार, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पैसे मिळतील, तर बाकी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
PM Kisan च्या २१ व्या हत्याची अपडेट काय? पैसे कधी जमा होणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement