Mini tractor: तरुण शेतकऱ्याची कमाल, कमी खर्च अन् जास्त उपयोग, बनवले खास मिनी ट्रॅक्टर, Video

Last Updated:

या ट्रॅक्टरला इंधन देखील कमी लागणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा पर्याय उपलब्ध झाला. सतीशच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगामुळे सध्या राज्यभरात त्याच्या नावाची चर्चा सुरू आहे.

+
कमी

कमी खर्च, जास्त उपयोग ; छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाने शेतकऱ्यांसाठी बनवले मिनि ट

छत्रपती संभाजीनगर : रांजणगाव येथील 25 वर्षीय सतीश मुंडे या तरुणाने मिनी ट्रॅक्टर बनवला आहे. या मिनी ट्रॅक्टरचा बागायती शेतीसाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे काम आणखी सोपे होणार आहे. या ट्रॅक्टरला इंधन देखील कमी लागणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा पर्याय उपलब्ध झाला. सतीशच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगामुळे सध्या राज्यभरात त्याच्या नावाची चर्चा सुरू आहे. साधारणपणे मिनी ट्रॅक्टरला बनवायला 2 महिने लागले असल्याचे सतीशने लोकल 18 शी बोलताना सांगितले आहे.
मिनी ट्रॅक्टर हा ज्या ठिकाणी मोठा ट्रॅक्टर किंवा बैलजोडी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी किंवा फळबागेच्या ठिकाणी या ट्रॅक्टरचा उपयोग करता येईल. हा ट्रॅक्टर कमी पैशात मिळणार असून याला वापरण्यासाठी खर्च देखील कमी लागणार आहे. हे मिनी ट्रॅक्टर तयार करायला साधारणपणे दोन महिने वेळ लागलेला आहे. ट्रॅक्टर बनवण्यासाठी खर्च 1 लाख 10 हजार रुपये इतका लागला आहे. आतापर्यंतचा सर्वात लहान आणि छोटा ट्रॅक्टर असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
एक-एक पाऊल पुढे टाकल्यानंतर आपोआप मार्ग दिसतो, त्यामुळे ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच ठिकाणी पूर्णपणे वेळ देऊन, मेहनत करून हाती घेतलेले काम साकार करण्यासाठी प्रयत्न करायला हवा तेव्हा यश नक्कीच मिळते तसे सतीश सांगतो. मिनी ट्रॅक्टरच्या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून या ट्रॅक्टर संदर्भात विचारणा करण्यासाठी अनेक नागरिक आणि कारागीर त्याच्याकडे येत आहेत.
advertisement
शासनाने कामाची दखल घेऊन छोटी कंपनी उभारण्यास मदत केली तर नक्कीच मिनी ट्रॅक्टर तयार करून शेतकऱ्यांच्या घरोघरी पोहोचवण्याचे काम करायला आवडेल असे त्याचे म्हणणे आहे. यापूर्वीही सतीशने हेलिकॉप्टर बनवला होता, सध्या मिनी रेल्वे आणि मिनी थार गाडी बनवण्याचे काम देखील सुरू असल्याचे त्याने सांगितलेय.
मिनी ट्रॅक्टर कसे बनवले?
मोठा ट्रॅक्टर किंवा बैलजोडी अरुंद जागेत किंवा बागायती शेतीत उपयोगी ठरत नाही हे लक्षात घेता सतीश मुंडे याने हा प्रयोग हाती घेतला. सुरुवातीला डिझाईन आणि आकाराचा आराखडा तयार करून छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजारातून सुटे पार्ट्स गोळा करण्यात आले. वेल्डिंग, कटिंग आणि जॉईंट्सच्या साहाय्याने ट्रॅक्टरची रचना उभी करण्यात आली. तसेच बारामतीहून मिनी ट्रॅक्टर साठी विशेष टायर बनवून आणलेले आहे. या संपूर्ण प्रक्रियेस साधारण दोन महिने लागले तर एकूण खर्च 1 लाख 10 हजार रुपये इतका आला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Mini tractor: तरुण शेतकऱ्याची कमाल, कमी खर्च अन् जास्त उपयोग, बनवले खास मिनी ट्रॅक्टर, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement