कुक्कुटपालन नव्हे तर केलं बदक पालन, आता वार्षिक 3 लाखांची उलाढाल, कसं केलं यशस्वी? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
अरुण शिंदे याने सुरुवातीला 50 बदकांपासून या व्यवसायाला सुरुवात केली होती. आज त्याच्याजवळ 200 हून अधिक बदक त्याच्या प्रो शक्ती ऍग्रो फार्ममध्ये आहेत.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे राहणारा तरुण अरुण शिंदे हा गेल्या 3 ते 4 वर्षांपासून बदक पालन करत आहे. सुरुवातीला अरुण याने 50 बदक आणून या व्यवसायाला सुरुवात केली होती. आज जवळपास वेगवेगळ्या जातीचे 200 बदक असून या व्यवसायातून तो वर्षाला 3 ते 4 लाखांची उलाढाल करत आहे. यासंदर्भात अधिक माहिती अरुण शिंदे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
advertisement
अरुण शिंदे याने सुरुवातीला 50 बदकांपासून या व्यवसायाला सुरुवात केली होती. आज त्याच्याजवळ 200 हून अधिक बदक त्याच्या प्रो शक्ती ऍग्रो फार्ममध्ये आहेत. बदकाच्या व्हरायटीमध्ये चिकनसाठी तसेच अंडी उत्पादनासाठी असे वेगवेगळे बदकाच्या जाती आहेत. चिकनसाठी व्हाईट पेकिन तर अंडी उत्पादनासाठी मस्कवी ही व्हरायटी आहेत. बदक पालनातूनही करून कुक्कुटपालन सारखाच फायदा घेऊ शकतो. याची माहिती देण्याचं काम ही अरुण शिंदे हा करत आहे. तसेच बदकांना कोणकोणते लसीकरण कधी कधी करायचे असते? त्यांचे खाद्य काय? त्यांचे संगोपन कसं करायचं? यासंदर्भात देखील अरुण शिंदे हा तरुण मोफत प्रशिक्षण देत आहे.
advertisement
अरुण शिंदे याच्या प्रो ऍग्रो फार्ममध्ये व्हाईट पेकिन, इंडियन रनर, खाकी कैंपबैल, मस्कवी, राजहंस बदक आहेत. आपल्या भागात ज्या पद्धतीने मार्केटिंग आहे, त्याप्रमाणे बदक आपल्या फॉर्ममध्ये ठेवून ठेवून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवू शकतो. बदक पालन हा कुक्कुटपालनापेक्षा कमी खर्चाचा व्यवसाय आहे.
advertisement
बदकांच्या पिल्लाच्या जातीनुसार त्यांची किंमत असते. इंडियन रनर, खाकी कैंपबैल या जातीच्या बदकांच्या पिल्लांची किंमत 35 ते 40 रुपयांपासून सुरुवात होते. तर व्हाईट पेकिन या बदकाच्या एका पिल्लाची किंमत 70 ते 100 रुपयांपर्यंत असते. मोठा बदक हा साधारणता 170 ते 200 रुपये किलो प्रमाणे विक्री केला जात आहे. या बदकांची विक्री मुंबई, हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी विक्री केला जात आहे. तर या बदक विक्रीच्या व्यवसायातून वर्षाला 3 ते 4 लाखांची उलाढाल होते, अशी माहिती अरुण शिंदे याने दिली आहे.
advertisement
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
March 31, 2025 8:32 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कुक्कुटपालन नव्हे तर केलं बदक पालन, आता वार्षिक 3 लाखांची उलाढाल, कसं केलं यशस्वी? Video