Success Story: डाळींबाची शेती करतानी अडचणी आल्या, योग्य प्रकारे केलं व्यवस्थापन, शेतकऱ्याला एकरी 12 लाखांचे उत्पन्न
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Success Story: डाळिंब बागांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने डाळिंब बागायतदार अडचणीत आला होता. तरुण शेतकरी अनिकेत दळवी यांनी तीन एकरात डाळिंब बागेचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले आहे.
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका डाळिंबाचा हब समजला जातो. परंतु काही वर्षांपूर्वी डाळिंब बागांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने डाळिंब बागायतदार अडचणीत आला होता. या अडचणींवर मात करत मोहोळ तालुक्यातील यावली येथील तरुण शेतकरी अनिकेत दळवी यांनी तीन एकरात डाळिंब बागेचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले आहे. डाळिंब लागवडीसाठी एकरी डाळिंबाला एकरी सव्वा दोन लाख रुपयांपर्यंत खर्च आला असून एकरी दहा ते बारा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. पाहुयात तरुण शेतकरी अनिकेत दळवे यांची ही यशोगाथा.
मोहोळ तालुक्यातील यावली येथील तरुण शेतकरी अनिकेत प्रभाकर दळवे यांनी तीन एकरात डाळिंबाची लागवड केली आहे. तीन एकरात जवळपास 1300 ते 1400 झाडांची लागवड केली आहे. जवळपास पाच वर्षांपासून तरुण शेतकरी अनिकेत हे डाळिंबाची शेती करत आहेत. डाळिंबाची लागवड करून बागेचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले.
advertisement
डाळिंबावर मर रोग, तेली रोग पडू नये यासाठी अनिकेतने विशेष काळजी घेतली. चार ते पाच दिवसाला डाळिंबावर स्प्रे द्वारे फवारणी करण्यात येत होती. जर पाऊस पडला तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी डाळिंबावर फवारणी करण्यात येत होती. डाळिंबावर मर रोग होऊ नये म्हणून डाळिंबाच्या खोडापासून औषधे देण्यात येत होते आणि बुडांवर स्प्रे सुद्धा मारण्यात येत होता.
advertisement
अनिकेत दळवी यांनी डाळिंबाची विक्री सोलापूर, हैदराबाद, गुलबर्गा, पंढरपूर येथे पाठवली आहे. तसेच इंदापूर येथील मार्केटला सुद्धा डाळिंबाची विक्री केली असून इंदापूर मधील मार्केटमध्ये डाळिंबाला चांगला दर मिळाला आहे. जवळपास इंदापूर मार्केटमध्ये अनिकेत यांच्या डाळिंबाला 450 किलो प्रमाणे दर मिळाला आहे. एकरात लागवड केलेल्या डाळिंबाची आतापर्यंत दोन तोडे झाले. जवळपास चार टन डाळिंबाचे उत्पादन मिळाले आहे.
advertisement
तीन एकरात डाळिंबाची लागवड करण्यासाठी एकरी अनिकेत दळवी यांना एकरी सव्वा दोन लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. तर सर्व खर्च वजा करून एकरी दहा ते बारा लाख रुपयांचे उत्पन्न तरुण शेतकरी अनिकेत दळवी यांना मिळाले आहे. व्यवसाय करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे नसून शिक्षण घेऊन सुद्धा व्यवसायात डोकं लावले तर नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल, असा सल्ला शेतकरी अनिकेत दळवे यांनी दिला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 28, 2025 12:21 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story: डाळींबाची शेती करतानी अडचणी आल्या, योग्य प्रकारे केलं व्यवस्थापन, शेतकऱ्याला एकरी 12 लाखांचे उत्पन्न