कृषी हवामान : खते,फवारणी थांबवा! या जिल्ह्यांत 24 तासांत पावसाचा जोर वाढणार,हवामान विभागानं दिला अलर्ट

Last Updated:

Maharashtra Weather Update : संपूर्ण देशभरात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे उत्तर भारतापासून दक्षिणेपर्यंत जोरदार पावसाची हजेरी लागली आहे. महाराष्ट्रातदेखील कोकण, मुंबई, उपनगर, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

maharashtra weather news
maharashtra weather news
मुंबई : संपूर्ण देशभरात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे उत्तर भारतापासून दक्षिणेपर्यंत जोरदार पावसाची हजेरी लागली आहे. महाराष्ट्रातदेखील कोकण, मुंबई, उपनगर, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, काही जिल्ह्यांमध्ये पावसाला थोडी विश्रांती मिळणार असली, तरी बहुतांश भागात जोरदार पावसाचा सिलसिला सुरूच राहणार आहे.
कोकण,घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने घाटमाथा आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि रायगडसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. गुजरातपासून केरळच्या उत्तर भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्यामुळे या भागांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक जाणवतोय.
मुंबईसह उत्तर कोकणात पावसाचा जोर
मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असून अधूनमधून जोरदार सरी येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवरून गोव्यापर्यंत पावसाच्या सरींचा जोर कायम राहणार आहे.
advertisement
मराठवाडा आणि विदर्भात दिलासादायक पाऊस
श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणे भरत असून, राज्यातील पाणीटंचाई लवकरच कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेती व्यवस्थापन कसं करायचे?
पीक व्यवस्थापन – सोयाबीन, ऊस, ज्वारी, बाजरी, हळद
advertisement
पिकात पाणी साचू नये, यासाठी निचरा होईल याची दक्षता घ्या. वापसा असताना तण नियंत्रण व अंतरमशागती करावी.
अळ्या व घाटेअळी नियंत्रणासाठी काय करावे?
प्रोफेनोफॉस 50% EC–20 मि./10 लि. पाणी, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 4.9% –6 मि./10 लि. पाणी याचा वापर करावा याने अळीवर नियंत्रण येईल.
सोयाबीनमध्ये पिवळेपणा दिसल्यास काय करावे?
मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 – 50 मि./10 लि. पाणी फवारावे. पांढऱ्या माशीवर नियंत्रणासाठी 10 पिवळे चिकट सापळे प्रति एकर लावावेत.
advertisement
फळबाग व्यवस्थापन (मोसंबी, संत्रा, डाळिंब, चिकू)
अतिरिक्त पाणी थांबू देऊ नका.
वापसा पाहून अंतरमशागती व तण नियंत्रण करा.
कीटकनाशक फवारणीसाठी उघडिपाची वाट पाहा.
डाळिंब बागेत अनावश्यक फुटवे काढावेत.
भाजीपाला व फुलशेती
भेंडी, कारले, दोडका यांची वापसा असताना लागवड करा. तसेच वांगी, मिरची, टोमॅटो रोपांना 45 दिवस झाल्यास पुनर्लागवड करा.
 महत्वाची सूचना
तसेच पुढील 2 दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे कोणतीही फवारणी किंवा खतमात्रा देण्याचे काम पुढे ढकला. पाऊस थांबल्यावर आणि वापसा झाल्यावरच शेतीची कामे करा.
advertisement
हवामानाचा नियमित अंदाज घ्या आणि योग्य ती खबरदारी घ्या.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : खते,फवारणी थांबवा! या जिल्ह्यांत 24 तासांत पावसाचा जोर वाढणार,हवामान विभागानं दिला अलर्ट
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement