advertisement

तुरीच्या दरात मोठी घसरण,10 हजारांवरून आले 6 हजार प्रतिक्विंटल वर, कारण काय?

Last Updated:

बाजारात तुरीची आवक येण्यास सुरुवात झाली आहे. पाहुयात जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक किती आहे आणि तुरीच्या दराची स्थिती काय आहे.

+
News18

News18

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : बाजारात तुरीची आवक येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तुरीला 9 हजार 500 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत होता. मात्र आवकीचा दबाव वाढल्याने तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या तुरीला 6 हजारांपासून 8 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. आगामी काळामध्ये तूर दर हे स्थिर राहतील असा अंदाज वर्तवला जात आहे. पाहुयात जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक किती आहे आणि तुरीच्या दराची स्थिती काय आहे.
advertisement
पंधरा दिवसांपूर्वी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 9 हजार 500 ते 10 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत होता. मात्र तुरीचे वाढलेले उत्पादन आणि आवकेत झालेली वाढ यामुळे तुरीच्या दरात 3 ते 4 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सध्या बाजारात दररोज 400 ते 500 क्विंटल तुरीची आवक होत आहे. या तुरीला गुणवत्तेनुसार 6 हजार रुपये प्रतिक्विंटल ते 8 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. हे दर अतिशय कमी असून यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल होणार आहे.
advertisement
सध्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून तुरीची मोठी आवक होत आहे. पंधरा दिवसांनी तुरीचे भाव 10 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचले होते. याला कारण म्हणजे तुरीचे सौदे झालेले असल्याने हे दर 10 हजारापर्यंत पोहोचले होते.
advertisement
मात्र सध्या डाळीची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असल्याने आणि त्यामध्ये कुठेही तुटवडा येण्याची शक्यता नसल्याने, त्याचबरोबर उत्पादनात दीडपट वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे तुरीचे दर हे 3 ते 4 हजार रुपये प्रति क्विंटलने कमी झाले आहेत. आगामी काळामध्ये तुरीची आवक वाढणार असली तरी दरामध्ये फारशी घसरण होणार नाही. तुरीचे दर 7000 ते 7500 रुपये प्रतिक्विंटल असे स्थिर राहतील अशी शक्यता जालना येथील व्यापारी संजय कानडे यांनी व्यक्त केली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
तुरीच्या दरात मोठी घसरण,10 हजारांवरून आले 6 हजार प्रतिक्विंटल वर, कारण काय?
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement