अतिपावसामुळे खरीप पिकांची मुळे कुजू नये यासाठी काय काळजी घ्यावी? A TO Z माहिती
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News :गेल्या काही गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यभरात कोसळलेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर गंभीर परिणाम झाला आहे. शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन, मका, भात, मूग-उडीद यांसारख्या पिकांच्या मुळे कुजण्याचा धोका वाढला आहे.
मुंबई : गेल्या काही गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यभरात कोसळलेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर गंभीर परिणाम झाला आहे. शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन, मका, भात, मूग-उडीद यांसारख्या पिकांच्या मुळे कुजण्याचा धोका वाढला आहे. शेतकऱ्यांसाठी हा मोठा धक्का असला तरी योग्य वेळी काळजी घेतल्यास नुकसान कमी करता येऊ शकते, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
निचऱ्याची व्यवस्था महत्त्वाची
अतिवृष्टीमुळे शेतात पाणी थांबल्यास पिकांच्या मुळांना ऑक्सिजन मिळत नाही आणि ती हळूहळू कुजायला लागतात. त्यामुळे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी निचऱ्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. शेताच्या बाजूला चर खोदणे, नाले तयार करणे किंवा पंपाद्वारे पाणी बाहेर काढणे ही कामे तातडीने करावीत. पाणी ओसरल्यानंतर मातीत हवा खेळती राहावी यासाठी अंतरमशागत करून माती हलकी करणे आवश्यक आहे.
advertisement
मुळे वाचवण्यासाठी योग्य फवारणी
पावसामुळे ओलावा वाढल्याने बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे मुळे सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य बुरशीनाशकांची फवारणी करणे उपयुक्त ठरते. तज्ज्ञांच्या मते,
कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब (Carbendazim + Mancozeb) या मिश्रणाची फवारणी मुळांवर होणाऱ्या कुज रोगांवर प्रभावी ठरते. कॉपर ऑक्सीक्लोराईड (Copper Oxychloride) देखील मुळे कुजण्यापासून संरक्षण देते.
याशिवाय, पानांवर डाग येणे किंवा पिवळसरपणा जाणवल्यास मॅन्कोझेब (Mancozeb 75% WP) किंवा क्लोरोथॅलोनील (Chlorothalonil) फवारणी करावी. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास हेक्साकोनाझोल (Hexaconazole) किंवा झिंक (Zinc) चा वापर करावा.
advertisement
पोषणद्रव्यांची कमतरता भरून काढा
अतिवृष्टीमुळे मातीतील पोषणद्रव्ये वाहून जातात. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनावर परिणाम होतो. यासाठी शेतकऱ्यांनी 10:26:26 पाण्यात विरघळणारे खते द्रवरूपात फवारावेत. तसेच फेरस सल्फेट + झिंक सल्फेट यांचे मिश्रण दिल्यास पिकांची हिरवळ टिकून राहते.
एकूणच, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना मोठा धोका निर्माण झाला असला तरी शेतकरी योग्य वेळी निचऱ्याची व्यवस्था, सेंद्रिय उपाय, बुरशीनाशक व पूरक खतांची फवारणी केल्यास मुळे वाचवता येऊ शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 20, 2025 8:39 AM IST








