फळबाग लावताना तुमची एक चूक पडेल महागात, लाखो रुपयांचा तोटा, कसं निवडायचं कलम?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Agriculture Tips: मराठवाड्यात जून-जुलै महिन्यात अनेकजण फळबागांची लावगड करतात. फळपिकांतून चांगला पैसा मिळवण्यासाठी फळ बागांच्या फायद्याच्या वाणांबाबत जाणून घेऊ.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात केशर आंबा, मोसंबी, सिताफळ, पेरू अशा विविध फळांची लागवड केली जाते. जून - जुलै महिन्यात फळ लागवडीला सुरुवात होत असते. मात्र बरेच शेतकरी कोणत्या फळाची लागवड फायदेशीर ठरेल? याबाबत संभ्रमात असतात. शेतकऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमधील हिमायत बाग येथे भरघोस उत्पन्न देणारी विविध वाणांची फळे लागवडीसाठी उपलब्ध आहेत. याबाबत फळ संशोधन केंद्र प्रमुख संजय पाटील यांनी लोकल 18 सोबत बोलतांना माहिती दिलीये.
फळ बागांचे फायद्याचे वाण
जून - जुलै मध्ये लागवड करण्यासाठी फळ पिकामध्ये आंबा या पिकामध्ये केशर, मोसंबीमध्ये न्यू सेलर, चिंचमध्ये नं.263, शिवाई प्रतिष्ठान, सीताफळामध्ये बालानगर, धारूर सिक्स, पेरू या पिकामध्ये सरदार वाण अतिशय फायदेशीर ठरणार आहे. शेतकऱ्यांनी फळ पिकाची लागवड करत असताना या कलमांच्या निवडीकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. कलमाची निवड करताना एक वर्षाची छोटी कलमे याला जारवा जास्त असतो, त्यामुळे याचा फायदा होतो. फळ पिकांची लागवड करताना दोन-तीन पाऊस झाल्यानंतरच लागवड करावी, असे देखील संजय पाटील यांनी सांगितले आहे.
advertisement
शाश्वत उत्पन्नासाठी माहिती
view commentsशाश्वत शेती आणि नफा मिळवण्यासाठी केवळ मेहनतच नव्हे तर योग्य माहिती आणि नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठासारख्या संस्थांकडून सुधारित वाणांची यादी प्रसिद्ध केली जाते. शेतकऱ्यांनी या माहितीचा अभ्यास करून स्थानिक हवामान, जमिनीस अनुरूप वाणांची निवड करावी. फळबाग लागवड ही दीर्घकालीन गुंतवणूक असते. त्यामुळे योग्य वाणांची निवड केल्यास पुढील अनेक वर्ष सातत्याने उत्पन्न घेता येते.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
May 29, 2025 10:53 AM IST

