TRENDING:

Soyabean Bajar Bhav : आवक पुन्हा वाढली! सोयाबीन दरात तेजी की घसरण? आजचं मार्केट काय?

Last Updated:

Today Soyabean Market Update : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शुक्रवार (21 नोव्हेंबर) आणि शनिवार (22 नोव्हेंबर) रोजी सोयाबीनच्या भावामध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी (21 नोव्हेंबर) आणि शनिवारी (22 नोव्हेंबर) सोयाबीनच्या भावामध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळाली. काही ठिकाणी सरासरी दर 4500 ते 5500 रुपयांच्या दरम्यान असताना, काही बाजारांमध्ये सर्वाधिक दर 5 हजार रुपयांपर्यंत दर मिळाले. सध्या दर वाढण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे बाजारात घटलेली आवक आणि वाढती मागणी असं आहे.
soyabean news
soyabean news
advertisement

21 आणि 22 नोव्हेंबरचा बाजार भाव काय?

आज तुळजापूर बाजारात 525 क्विंटलची आवक नोंदली गेली आणि सर्व दर 4550 रुपये प्रतिक्विंटल इतके स्थिर होते. नागपूर बाजारात लोकल सोयाबीनचा दर 3800 ते 4460 रुपयांच्या दरम्यान राहिला आणि सरासरी 4295 रुपये मिळाले. मागील दिवसापासून तुलना करता नागपूरच्या बाजारसमितीमध्ये किंमतीत हलकी सुधारणा पाहायला मिळाली. दुसरीकडे 21 नोव्हेंबर रोजी लासलगाव, माजलगाव, रिसोड, श्रीरामपूर, कोपरगाव, मेहकर, धुळे, सेलू, चंद्रपूर आदी बाजारात सरासरी दर 4300 ते 4700 रुपयांच्या दरम्यान राहिला.

advertisement

जालन्यात सर्वाधिक दर

जालना बाजार समितीत 18 हजार 157 क्विंटलची मोठी आवक असून सर्वाधिक दर थेट 6 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका नोंदवण्यात आला. यामुळे लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. लातूर बाजारातही 17 हजार 151 क्विंटल आवक झाली असून सर्वाधिक दर 4809 तर सरासरी दर 4750 रुपये नोंदवला गेला, जो चालू हंगामातील सर्वोत्तम दरांपैकी एक मानला जात आहे.

advertisement

रिसोड बाजारातही 4300 ते 4750 असा दर मिळत असून सरासरी 4525 रुपये नोंदला गेला. पिंपळगाव (ब.) पालखेड बाजारात हायब्रीड सोयाबीनला 3500 ते 4701 इतका दर मिळाला तर सोलापूरमध्ये लोकल सोयाबीनने 2500 ते 4725 रुपयांचा आकडा गाठला. याशिवाय हिंगोली, औसा, निलंगा, उमरखेड, सिंदी (सेलू), वाशी (धाराशिव), परतूर, गंगाखेड, मुरुम, उमरगा, बुलढाणा, घाटंजी, उमरेड, पैठण या बाजार समित्यांमध्येही दर 4300 ते 4700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'परिस्थिती बरी नाही, जाऊ नको' मृत 'श्री'ची परिस्थिती ऐकून डोळ्यात येईल पाणी!
सर्व पहा

पुढील काही आठवड्यांत सरासरी दर 4500 ते 5200 रुपयांदरम्यान राहू शकतात, तर उच्च प्रतीच्या सोयाबीनला 5500 ते 6000 किंवा त्यापुढेही दर मिळू शकतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे साठा आहे, त्यांनी बाजारातील घसरणीची भीती न बाळगता भावाचे निरीक्षण करून विक्री करावी, असा सल्ला दिला जात आहे.

मराठी बातम्या/कृषी/
Soyabean Bajar Bhav : आवक पुन्हा वाढली! सोयाबीन दरात तेजी की घसरण? आजचं मार्केट काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल