अरुण कोते यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये डाळिंबाची लागवड केली आणि ती भगवा जातीच्या डाळिंबाची आणि त्यानंतर 18 महिन्यानंतर पहिली बार आली. डाळिंबाची शेती करताना जर ती नीट लक्ष देऊन आणि वेळेचे व्यवस्थापन करून केली तर नक्कीच चांगले उत्पन्न यातून मिळू शकतं, असं यावेळी अरुण कोते म्हणाले.
advertisement
डोंगरची काळी मैना! पिटुकलं फळ, पण दमदार गुणधर्म, पावसाळ्यात खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
त्याचप्रमाणे या पिकाला कमी पाणी लागतं. तसेच फळे निघेपर्यंत दहा दिवसांच्या अंतराने त्याला पाणी द्यावं लागतं आणि जर पाण्याचे प्रमाण अति झालं तर फळांना तडे पडण्याची शक्यता असते. ज्यावेळेस फळाची काढणी होते त्यानंतर बागेला पाणी द्यायला थांबवले पाहिजे आणि त्यानंतर डाळिंबाचे झाड ताणावर असताना दीड महिना पाणी पूर्णपणे बंद केले. असं नियोजन केल्यानंतर डाळिंबाचं पीक हे चांगल्या पद्धतीने येतं, अशी माहिती यावेळी त्यांनी सांगितली.
जवळपास तीन वर्षांचा कालावधी गेल्यानंतर आणि बागेची चांगली काळजी घेऊन पहिल्या वर्षात त्यांना जवळपास 10 लाखापर्यंत उत्पन्न मिळवले. सुरुवातीला त्यांना एका झाडापासून 20 किलो उत्पन्न निघाले. ते त्यांनी 128 रुपये किलो विकले आणि यातून त्यांना जवळपास 10 लाखापर्यंतचे उत्पन्न मिळालंय. काळ्या मातीत त्यांनी डाळिंबाचे पीक यशस्वी केलय.