व्यवसायाची सुरुवात करणे हे सोपे नव्हते. त्यांना कोणत्याही व्यवसायाचा पूर्वानुभव नव्हता त्यामुळे अनेक अडचणी आल्या. व्यवसाय कोणता करायचा? कुठून सुरुवात करायची? भांडवल कसे? उभारायचे हे प्रश्न त्यांच्यासमोर होते. मात्र ते हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांचा एक मित्र सेंद्रिय गूळ उद्योगात कार्यरत होता आणि त्याच्याकडून प्रेरणा घेत त्यांनीही गूळ निर्मितीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसायाच्या सुरुवातीला अनेक अडथळे आले पण त्यांनी जिद्दीने आणि चिकाटीने परिस्थितीवर मात केली.
advertisement
Youtube वरून घेतली माहिती, घरातच सुरू केला केशर शेतीचा प्रयोग, महिलेची लाखोंची कमाई
सेंद्रिय गूळ हा आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अण्णासाहेब मोरे यांनी या संधीचा फायदा घेतला आणि गूळ उत्पादनासाठी योग्य तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यांनी पारंपरिक पद्धतीने गूळ तयार करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यामुळे त्यांचा गूळ चविष्ट आणि गुणवत्तेत उच्च राहू लागला. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला आणि आज ते स्थिर उत्पादन आणि विक्री करत आहेत.
आज त्यांच्या व्यवसायाची स्थिती पाहता ते किरकोळ स्वरूपात गूळ विक्री करत असले तरी त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि चव यामुळे ग्राहकांची पसंती मिळते. स्थानिक बाजारपेठेत त्यांच्या गुळाची मोठी मागणी आहे. त्यांनी आपल्या उत्पादनाचा ब्रँड निर्माण करण्यावर भर दिला आहे. भविष्यात आपल्या व्यवसायाला आणखी मोठ्या स्तरावर नेण्याचा त्यांचा मानस आहे.
नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला हा विचार त्यांनी मनाशी पक्का केला आणि त्यानुसार मेहनत घेतली. त्यांचा व्यवसाय आज यशस्वी झाला असून त्यांना या उद्योगातून वर्षाला 8 लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो. कमी वेळात आणि मोठ्या जिद्दीने त्यांनी मिळवलेले हे यश खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांची ही कहाणी नव्या पिढीतील उद्योजकांसाठी एक उत्तम उदाहरण ठरू शकते.