मंत्री समितीतील चर्चा
राज्यातील आगामी ऊस गाळप हंगामाच्या नियोजनासंबंधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत व्हीएसआयला दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या मुद्द्यावर विशेष चर्चा झाली.
साखर कारखान्यांकडून प्रति टन ऊस गाळपावर एक रुपया या प्रमाणात निधी कपात करून तो व्हीएसआय संस्थेला दिला जातो. मात्र, या निधीचा खरंच त्या उद्देशासाठी वापर होत आहे का? याबाबत शासन चौकशी करणार आहे.
advertisement
अहवाल शासनाला सादर होणार
या चौकशी समितीला ठराविक कालावधीत आपला अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवालाच्या आधारे शासन पुढील निर्णय घेणार आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार हे वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. तसेच आता चौकशी लागल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 9:29 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
मोठी बातमी! राज्यातील प्रसिद्ध साखर कारखान्याच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश, समिती स्थापन करणार
