TRENDING:

तुमच्याकडे Farmer ID नाहीये का? मग हे काम करावेच लागणार,अन्यथा आर्थिक मदत मिळणार नाही

Last Updated:

Agriculture News : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या ‘अॅग्रीस्टॉक’ योजनेत आता प्रत्येक सातबाराधारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या ‘अॅग्रीस्टॉक’ योजनेत आता प्रत्येक सातबाराधारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदतीसाठी आणि नुकसानभरपाईसाठी अर्ज करताना फार्मर आयडी दाखवणे बंधनकारक आहे. फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना मात्र ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, अन्यथा त्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागेल.
Agriculture News
Agriculture News
advertisement

आर्थिक मदत वाटपास सुरुवात

सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात सीना आणि भीमा नद्यांना आलेल्या पूरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. जिल्ह्यातील एकूण ८० महसूल मंडळांमध्ये ७ लाख ६४ हजार १७३ शेतकरी बाधित झाले आहेत. या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य शासनाने ८६७ कोटी ३३ लाख ६३ हजार ८५५ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, अनेकांना रकमेचा लाभ मिळायला प्रारंभ झाला आहे.

advertisement

ई केवायसी अनिवार्य

तथापि, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांवर अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. दिवाळीनंतर चार दिवस उलटूनही काही शेतकऱ्यांना मदत निधी मिळालेला नाही. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे आणि अॅग्रीस्टॉक योजनेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना ई-केवायसी करण्याची गरज नाही. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॉक क्रमांक नाही किंवा फार्मर आयडी तयार केलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

advertisement

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “फार्मर आयडी ही शेतकऱ्यांसाठी एकसंध ओळख प्रणाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनांमध्ये पारदर्शकता वाढेल आणि मदत थेट त्यांच्या खात्यात जमा होईल. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे सर्व्हर बंद पडतो आहे, तो प्रश्न लवकरच सोडवला जाईल.”

सध्या महसूल आणि कृषी यंत्रणा शेतकऱ्यांचे ई-केवायसी काम जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. काही ठिकाणी ग्रामपंचायती आणि कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

एकूणच, अतिवृष्टी आणि पूरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी अॅग्रीस्टॉक आणि फार्मर आयडी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

मराठी बातम्या/कृषी/
तुमच्याकडे Farmer ID नाहीये का? मग हे काम करावेच लागणार,अन्यथा आर्थिक मदत मिळणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल