फुलंब्रीच्या सताळ पिंपरी येथील धनराज जंजाळ यांना वाल शेतीतून गतवर्षी 3.50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा देखील अंकुर वाल शेंगा वाणाची लागवड त्यांनी केलेली आहे. या शेतीसाठी ठिबकद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे. दर चार ते पाच दिवसाला वालाच्या वेलांना वातावरणानुसार पाणी देण्यात येते. तसेच या शेतीसाठी रासायनिक खतांसह शेणखताचा देखील वापर करण्यात येतो. वाल वेलवर प्रामुख्याने पाहिले तर अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असतो मात्र योग्य फवारणी केली तर त्याला आटोक्यात देखील आणता येते.
advertisement
वाल शेती पाहण्यासाठी आणि त्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी दररोज अनेक शेतकरी येत असतात. अनेक शेतकऱ्यांनी वाल शेतीचा प्रयोग पाहून ही शेती करायला सुरुवात केली आहे. तसेच या शेतीमध्ये पारंपरिक पिकांपेक्षा अधिक उत्पन्न मिळते. विशेषतः शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही त्यामुळे वाल शेती शेतकऱ्यांनी करायला हवी, अशी देखील प्रतिक्रिया जंजाळ यांनी दिली आहे.





