कागदपत्रे कोणती?
या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी ओळखपत्र (आधार/पॅन), जमिनीची माहिती, बँक खाते, शेतकरी ओळख क्रमांक, प्रकल्पाचे तांत्रिक तपशील आणि स्थानिक मंजुरीपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
Success Story : पारंपरिक शेतीला दिला फाटा, 30 गुंठ्यात केली अंजिर लागवड, 3 लाख उत्पन्न
आता या योजनेचा लाभ कुणाला घेता येणार?
ही योजना आता केवळ संस्थांपुरती मर्यादित राहिलेली नाही. वैयक्तिक शेतकऱ्यांनाही थेट उपलब्ध झाली आहे. याचा लाभ जे शेतकरी तेलबिया पिकांचे उत्पादन करतात ते घेऊ शकतात. देशात तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवणे आणि आयातीवर अवलंबित्व कमी करणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे.
advertisement
अनुदान किती टक्के मिळणार
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या तेलबिया प्रक्रिया युनिट, प्लांट, तेलघाणा आणि गोदामांसाठी 33 टक्के किंवा 9.90 लाखांपर्यंत अनुदान दिले जाईल.
लाभासाठी पात्रता आणि निकष काय?
योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना मिळू शकतो, जे तेलबिया पिकांचे उत्पादन घेतात किंवा त्यावर आधारित प्रक्रिया-उपक्रम उभारू इच्छित आहेत. अर्जदाराकडे प्रकल्पासाठी जमिनीची मालकी किंवा भाड्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
कुठे व कसा करायचा अर्ज?
शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन करता येतो. अर्जासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी लागते. प्रमुख बाबी म्हणजे तेलबिया प्रक्रिया युनिट, ज्याद्वारे तेलबिया पिकांपासून तेल काढले जाते. तसेच लहान व मध्यम प्लांट स्थापन करणे, तेलघाणा केंद्र उभारणे, गोदाम व साठवण सुविधा तयार करणे आणि काढणी पश्चात उपयुक्त उपकरणे वापरणे, या सर्व प्रकल्पांसाठी अनुदान मिळते.





