TRENDING:

आंबिया बहारासाठी करा झाडे तयार, हिवाळ्यात असं करा संत्रा बागेचं पुनर्नियोजन, तज्ज्ञांचा सल्ला

Last Updated:

आता जवळपास सर्वच शेतकऱ्यांची संत्रा बाग रिकामी झाली आहे. त्यामुळे आता झाडांची काळजी घेऊन आंबिया बहारासाठी झाडे तयार करणे गरजेचे आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : यावर्षी पावसामुळे संत्रा पिकाचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या संत्रा बागा देखील उद्ध्वस्त झाल्यात. आता जवळपास सर्वच शेतकऱ्यांची संत्रा बाग रिकामी झाली आहे. त्यामुळे आता झाडांची काळजी घेऊन आंबिया बहारासाठी झाडे तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आता संत्रा बागेचे नियोजन नेमकं कसं असावं? याबाबत माहिती कृषी मार्गदर्शक आणि प्रगतशील शेतकरी मयूर देशमुख यांनी दिली.
advertisement

अमरावती जिल्ह्यातील काजळी या गावातील मयूर देशमुख हे प्रगतशील शेतकरी आहेत. ते शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेती करतात. तसेच शेतकऱ्यांना विविध पिकांच्या नियोजनासाठी मार्गदर्शन देखील करतात. सध्या म्हणजेच डिसेंबर महिन्यात संत्रा बागेचे नियोजन कसं करावं? याबाबत माहिती देताना ते सांगतात की, मी जे सर्व मार्गदर्शन शेतकऱ्यांना करतो ते सर्व प्रॅक्टिकल मी माझ्या शेतात केलेलं असते. आताही शेतात संत्रा बागेचे नियोजन सुरू आहे.

advertisement

शेवगा महागला, जालन्यात किलोला मोजावे लागतायत 400 रुपये, कारण काय?

झाडांची सल काढणे

सध्या संत्राच्या झाडांवर आपोआप ताण निर्माण झाला आहे. जो पुढील बहरासाठी उत्तम आहे. अशात सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडांची सल वेगळी करणे म्हणजेच वाळलेल्या फांद्या झाडातून काढून टाकणे. कारण त्यातील काही भागांवर बुरशी चढलेली असते. ती फांदी झाडात राहिल्यास पूर्ण झाड त्यामुळे खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही बाब लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

advertisement

फायटोप्थरा रोगाचे नियोजन

त्यानंतर झाडाच्या मुळाशी गडेदार चुना तुम्ही टाकू शकता. यामुळे फायटोप्थरा असल्यास त्याला आळा घालता येईल. तसेच झाडावर ताण निर्माण होऊन फांद्यांना स्टोरेज तयार करण्यासही मदत होईल. फायटोप्थरा या रोगाला आळा घालणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं संपूर्ण बाग उद्ध्वस्त होऊ शकते.

झाडांच्या पानांवर असणारे पांढरे ठिपके म्हणजे मित्र कीड

advertisement

तसेच आणखी एक म्हणजे झाड जेव्हा स्टोरेज तयार करते तेव्हा झाडांच्या पानाला मधात नाली पडते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना एक गैरसमज असा आहे की, झाडांच्या पानांवर असणारे पांढरे ठिपके म्हणजे रोग आहे. पण तो रोग नसून मित्र कीड आहे. ज्याला फवारणीची गरज नाही.

फवारणी कोणती करावी?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रावर बुधवारी कोल्ड वेव्हचं संकट, 11 जिल्ह्यांना अलर्ट
सर्व पहा

तसेच फवारणीसाठी 200 लिटर ट्रमला 150 मिली मिओथीन आणि ब्ल्यू कॉपर किंवा टॉप गन घेऊ शकता. टॉप गन हे विद्राव्य आहे. त्यामुळे त्याचे रिझल्ट चांगले आहेत. ही फवारणी केल्यानंतर 15 दिवसांनी याचा छान रिझल्ट दिसून येईल. आता जसजशी थंडी वाढेल तसतसं झाडांचं स्टोरेज वाढेल आणि पानाला नाली पडताना दिसेल, अशा प्रकारे सध्या तुम्ही नियोजन करू शकता.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
आंबिया बहारासाठी करा झाडे तयार, हिवाळ्यात असं करा संत्रा बागेचं पुनर्नियोजन, तज्ज्ञांचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल