अशी राहिली केळीची आवक: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 718 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 430 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 4000 ते जास्तीत जास्त 5000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजार भाव मिळाला.
गुळास चांगला उठाव: राज्याच्या मार्केटमध्ये 638 क्विंटल गुळाची एकूण आवक झाली. यापैकी 328 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 4201 ते 4401 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 168 क्विंटल गुळास प्रतीनुसार 2900 ते 3400 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
आल्याच्या आवकेत घट: राज्याच्या मार्केटमध्ये 1444 क्विंटल आल्याची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 998 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 4400 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 4000 ते 7000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
तीळास चांगला उठाव: संक्रांतीच्या एक महिना आधी तीळाची आवक वाढली आहे. आज राज्याच्या मार्केटमध्ये 26 क्विंटल तीळाची एकूण आवक राहिली. यापैकी अकोला मार्केटमध्ये आवक झालेल्या 10 क्विंटल तीळास 10200 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक बाजार भाव मिळाला.