कपाशीचे दर दबावात
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यभरात कपाशीची एकूण 11 हजार 238 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये नागपूर बाजारात सर्वाधिक सुमारे 3 हजार क्विंटल कपाशीची आवक नोंदवली गेली. येथे कपाशीला किमान 7 हजार 900 ते कमाल 7 हजार 950 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर परभणी बाजारात कपाशीला प्रतिक्विंटल 8 हजार 325 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. मात्र, मंगळवारीच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा बदलली हवा, आता येणार नवसंकट, हवामान खात्याकडून अलर्ट
कांद्याच्या दरात वाढ
राज्यात आज कांद्याची एकूण 2 लाख 83 हजार 690 क्विंटल इतकी आवक झाली. नाशिक बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक 1 लाख 11 हजार 211 क्विंटल आवक नोंदवण्यात आली. या बाजारात कांद्याला किमान 478 ते कमाल 1 हजार 447 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर नागपूर बाजारात लोकल कांद्याला प्रतिक्विंटल 2 हजार 560 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाल्याचे दिसून आले. मंगळवारीच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.
सोयाबीनचे भाव घसरले
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये सोयाबीनची एकूण आवक 18 हजार 435 क्विंटल इतकी झाली. अकोला बाजारात 4 हजार 802 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, येथे किमान 5 हजार 335 ते कमाल 5 हजार 675 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वाशिम बाजारात पिवळ्या सोयाबीनला 6 हजार 050 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला. मात्र, मंगळवारीच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे.
तुरीच्या दरात नरमाई
राज्यात आज तुरीची एकूण 15 हजार 340 क्विंटल इतकी आवक झाली. अमरावती बाजारात सर्वाधिक 3 हजार 531 क्विंटल तुरीची आवक झाली. येथे तुरीला किमान 8 हजार ते कमाल 8 हजार 750 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर लातूर बाजारात तुरीला 9 हजार 130 रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव मिळाल्याचे दिसून आले. मात्र, मंगळवारीच्या तुलनेत आज तुरीच्या दरातही घट झाल्याचे चित्र आहे.





