कपाशीच्या दरात वाढ
आज राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये कपाशीची एकूण 14 हजार 522 क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली. 3 हजार 252 क्विंटल सर्वाधिक आवक अकोला बाजारात झाली. त्याठिकाणी कपाशीला 8010 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. बुलढाणा बाजारात आलेल्या कपाशीला 8 हजार 395 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. बुधवारी नोंदवलेल्या बाजारभावांच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 12 महत्त्वाचे! एक नाही दोन संकट आली, IMD नं दिला अलर्ट
कांद्याचे दर स्थिर
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये कांद्याची एकूण 1 लाख 83 हजार 466 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये नाशिक बाजारात 76 हजार 922 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक नोंदवली गेली. या बाजारात कांद्याला किमान 325 ते कमाल 1 हजार 425 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर नागपूर बाजारात आवक झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 2 हजार 560 रुपयांचा सर्वाधिक दर मिळाल्याचे दिसून आले. बुधवारी मिळालेला उच्चांकी दर आज स्थिर आहे.
सोयाबीनच्या दरात घट
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये सोयाबीनची एकूण आवक 8 हजार 063 क्विंटल इतकी नोंदवण्यात आली. लातूर बाजारात 2 हजार 769 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्याठिकाणी सोयाबीनला कमीत कमी 5 हजार 539 तर जास्तीत जास्त 5 हजार 881 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. नाशिक बाजारात आवक झालेल्या सोयाबीनला 5 हजार 961 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. बुधवारीच्या तुलनेत आज सोयाबीनच्या बाजारभावात घट नोंदवण्यात आली आहे.
तुरीच्या दरात वाढ
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये तुरीची एकूण 10 हजार 029 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये जळगाव बाजारात 2 हजार 626 क्विंटल तुरीची सर्वाधिक आवक झाली. येथे तुरीला किमान 7 हजार 400 ते कमाल 8 हजार 376 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. सोलापूर बाजारात आवक झालेल्या तुरीला 9 हजार 300 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. बुधवारी नोंदवलेल्या दरांच्या तुलनेत आज तुरीच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.





