जालना जिल्ह्यातील राजूर येथील या तरुणाचे नाव मारोती पालोदे आहे. घरची परिस्थिती सधन असल्याने त्यांनी स्पेन या देशात आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंजिनिअरिंग व्यवसायात नशीब आजमावून पाहिले. परंतु, घेतलेल्या एका निर्णयामुळे निराशेत जाण्याची वेळ आली. तेव्हा मात्र त्यांना गीर गाईंनी मानसिक स्थिरता दिली. गोसेवा माझ्या नशिबातच लिहिली होती, असे ते गमतीने सांगतात.
advertisement
सध्या त्यांच्याकडे 100 हून अधिक गीर गाई आहेत. त्यांच्या योग्य व्यवस्थापनातून त्यांना दररोज 300 ते 400 लिटर दूध मिळते. या दुधाची 80 रुपये लिटरने विक्री होते. शिल्लक राहिलेल्या दुधापासून तूप, बासुंदी, पनीर, पेढे, लस्सी असे दुग्धजन्य पदार्थ ते बनवतात. दररोज 10 ते 15 हजार व्यवस्थापनाचा खर्च होतो, तर 30 हजार रुपये मिळतात. असा रोज 10 ते 15 हजार रुपये निव्वळ नफा ते कमावतात. वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल ते करत आहेत.
50 वर्षांच्या चवीची जपली परंपरा,150 पदार्थांचे फूड डेस्टिनेशन, तुम्हाला पुण्यातील हे ठिकाण माहितीये?
ब्रीडिंगसाठी ब्राझीलचे तंत्र
पालोदे यांच्या गोठ्यातील अनेक गाई या ब्राझील येथील वळूचे वीर्य वापरून तयार केल्या आहेत. गीर गाईची दूध देण्याची क्षमता त्यांनी 27 लिटरपर्यंत वाढवली आहे.
अनेक बक्षिसांची लयलूट
जालना येथे 2019 मध्ये झालेल्या पशुधन प्रदर्शनात त्यांच्या गाईने दुसरा क्रमांक मिळवला, तर शिर्डी येथे झालेल्या प्रदर्शनात राज्यात प्रथम त्यांची मनी नावाची गाय आली.
गाईच्या शेण आणि गोमूत्र विक्रीतून कमाई
देशी वाणाच्या गाईच्या शेण आणि गोमूत्राचा वापर जीवामृत तयार करण्यासाठी होतो. अनेक फळ पिकांना जीवामृत फवारणी गरजेची असते. गीर गाईच्या गोमूत्र आणि शेण विक्रीतून देखील पालोदे यांना अधिकचे उत्पन्न मिळते.





