अमूलकडून स्पष्टीकरण
अमूलने दिलेल्या माहितीनुसार दुधाच्या दरात तूर्तासतरी कोणतेही बदल होणार नाहीत. GST हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीसुद्धा 22 सप्टेंबरनंतरही अमूलच्या दुधाचे दर हे आधीसारखेच राहणार आहेत. त्यामुळे या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. जे अमूलचं दूध घेतात त्यांना आधीसारखेच एक लिटरसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
advertisement
निर्णय का घेण्यात आला?
दूध ही दैनंदिन वापरातील सर्वात महत्त्वाची वस्तू मानली जाते. महागाईमुळे गेल्या काही वर्षांत त्याच्या किमती सतत वाढल्या आहेत. त्यामुळे घरगुती बजेटवर ताण येत आहे. सरकारने या वस्तूवरील कर काढून टाकण्यामागे उद्दिष्ट असे की दूध सामान्य लोकांच्या आवाक्यात राहावे. ग्राहकांना दिलासा देण्यासोबतच दुग्धउत्पादन आणि विक्री यांनाही चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
सध्याचे दूध दर
सध्या बाजारात अमूलचे फुल क्रीम दूध (अमूल गोल्ड) सुमारे 69 रुपये प्रति लिटर आणि टोन्ड दूध 57 रुपये प्रति लिटर दराने विकले जाते. मदर डेअरीचे फुल क्रीम दूधही 69 रुपयांनाच तर टोन्ड दूध 57 रुपयांना उपलब्ध आहे. म्हशीचे दूध सरासरी 74-75 रुपये प्रति लिटर तर गाईचे दूध 58-59 रुपये प्रति लिटरला मिळते. यामध्ये जीएसटीचा मोठा वाटा असल्याने ग्राहकांना अतिरिक्त खर्च करावा लागत होता.
किती होणार बचत?
जीएसटी हटवल्यानंतर दूध प्रतिलिटर 3 ते 4 रुपयांनी स्वस्त होईल. मदर डेअरीचे फुल क्रीम दूध आता 65-66 रुपयांत मिळू शकेल. टोन्ड दूध 54-55 रुपयांदरम्यान येईल. म्हशीचे दूध 71-72 रुपयांवर आणि गाईचे दूध 55-57 रुपयांपर्यंत खाली येईल. या घटनेचा परिणाम फक्त ग्राहकांवरच नव्हे तर मोठ्या प्रमाणात दूध वापरणाऱ्या हॉटेल व्यवसाय, मिठाई दुकाने आणि कॅन्टीन यांनाही होणार आहे.
अमूल आणि मदर डेअरीचे संभाव्य नवे दर
मदर डेअरी फुल क्रीम : 69 → 65-66 रुपये
मदर डेअरी टोन्ड मिल्क : 57 → 55-56 रुपये
मदर डेअरी म्हशीचे दूध : 74 → 71 रुपये
मदर डेअरी गायीचे दूध : 59 → 56-57 रुपये
नवे दर कधीपासून?
सरकारचा हा निर्णय 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे. त्या दिवसापासून देशभरातील सर्व पॅकेज्ड दुधाच्या उत्पादनांवरून जीएसटी हटविला जाईल. त्यामुळे बाजारात दूध स्वस्त होईल आणि ग्राहकांना थेट दिलासा मिळेल.
दरम्यान, दररोज वापरल्या जाणाऱ्या दुधासारख्या वस्तू स्वस्त होण्यामुळे कुटुंबांचे मासिक बजेट काही प्रमाणात हलके होणार आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय सामान्य ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. यामुळे दुधाच्या मागणीत वाढ होऊन शेतकरी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रालाही फायदा होईल.