ग्राहक व्यवहार विभाग (DoCA), भारत सरकार यांच्या निर्देशांनुसार नाफेडने या वर्षी महाराष्ट्रात केवळ १२ मेट्रिक टन (MT) कांद्याचीच विक्री केली आहे. या पेक्षा अधिक विक्री झालेली नाही. त्याचप्रमाणे सध्या राज्यात नाफेडकडून कांद्याची विक्री केली जात नसल्याचेही नाफेडच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचे हित जपणे व बाजारातील स्थिरता राखणे हेच नाफेडचे सर्वोच्च प्राधान्य असून नाफेड शासनाच्या निर्देशांनुसारच सातत्याने कार्यरत राहील, असे सांगून नाफेड अशा प्रकारच्या खोट्या बातम्या आणि अफवांचा तीव्र निषेध करते आणि त्या पसरविणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नाफेड मार्फत देण्यात आला आहे.
advertisement
नाफेडच्या माध्यमातून तांदूळ, पीठ आणि कांदा विक्रीसाठी वाहनांना हिरवा झेंडा
केंद्र सरकारच्या वतीने नाफेडच्या माध्यमातून ‘भारत’ ब्रँडची उत्पादने सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याचा भाग असलेली ‘भारत’ आटा (गव्हाचे पीठ), तांदूळ आणि कांदा ही उत्पादने राज्यात सहकारी ग्राहक भांडारच्या सहयोगातून सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
परवडणाऱ्या किमतीत आवश्यक आणि दर्जेदार अन्नपदार्थांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेनुसार केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वतीने ‘भारत’ ब्रँड उत्पादनांची विक्री केली जात आहे.